NCP : भाेंदूबाबा म्हटल्याने एनसीपी आक्रमक; 'सगळेच जास्त शहाणे झालेत, देवाने सर्वांना राताे रात अक्कल दिली'

शरद पवार, जयंत पाटील यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीने सत्तेचे स्वप्न सोडुन द्यावे असे बावनकुळेंनी साता-यात म्हटलं हाेते.
praful patel, chandrashekhar bawankule, sharad pawar, gondia
praful patel, chandrashekhar bawankule, sharad pawar, gondiasaam tv

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना साता-यात भोंदूबाबाची उपमा दिली. त्यावरुन राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात बावनकुळेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दहन करीत आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी या सर्वांना (टीकाकरांना) देवाने रातो रात अक्कल दिल्याचे म्हटलं आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शुक्रवारी सातारा जिल्हा दाै-यावर हाेते. पत्रकारांशी बाेलताना उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादीने (ncp) जादुटोणा करुन जाळ्यात ओढलं अशी टीका केली. तसेच शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदुबाबा आहेत असे म्हटलं. (chandrashekhar bawankule latest marathi news)

praful patel, chandrashekhar bawankule, sharad pawar, gondia
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच... राजन पाटलांच्या वक्तव्यावर उमेश पाटील म्हणाले..,

बावनकुळे यांच्या टीकेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. आज गाेंदिया येथे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले कुणी अशा लहान गोष्टी करीत असेल तर काय. त्यावर आम्ही काय भाष्य करणार. सर्व आता जास्त शहाणे झालेत, देवाने सर्वांना रातो-रात अक्कल दिली असा टाेमणा पटेल यांनी बावनकुळेंना लगावला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

praful patel, chandrashekhar bawankule, sharad pawar, gondia
Maharashtra News : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात क्राईम ब्रॅंचने आठ काेटींच्या बनावट नाेटा केल्या जप्त
praful patel, chandrashekhar bawankule, sharad pawar, gondia
Maharashtra Politics : शरद पवार जादुटोणा करणारे भोंदुबाबा; टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे हे काय बोलून गेले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com