Maharashtra News : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात क्राईम ब्रॅंचने आठ काेटींच्या बनावट नाेटा केल्या जप्त

पोलिसांचे पथक या नोटा छापणाऱ्या कारखान्याचा शोध घेत असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे.
thane, fake notes, Rs 2000
thane, fake notes, Rs 2000saam tv

Maharashtra News : ठाणे गुन्हे शाखेच्या (Thane Crime Branch) युनिट पाचने आज (शनिवार) दाेन हजार रुपयांच्या एकूण आठ कोटी बनावट भारतीय नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दाेघांना अटक केली आहे. या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी दाेघांचा प्रयत्न हाेता असे पाेलिसांनी सांगितले. (Thane Latest Marathi News)

पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार तपासादरम्यान दाेघांकडून दाेन हजार रुपयांच्या बनावट भारतीय नोटा छापल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून एकूण चारशे बंडल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील अन्य संशयित आरोपींचा शोध सुरु आहे. (Maharashtra News)

thane, fake notes, Rs 2000
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच... राजन पाटलांच्या वक्तव्यावर उमेश पाटील म्हणाले..,

पोलिसांचे पथक या नोटा छापणाऱ्या कारखान्याचा शोध घेत असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४८९ (ए), ४८९ (ब), ४८९ (सी) आणि ३४ अन्वये गमोहन कासारवडवली (thane) पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

thane, fake notes, Rs 2000
Pratapgad : अफजल खान, सय्यद बंडा व्यतरिक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' दाेन कबरी काेणाच्या ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com