Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच... राजन पाटलांच्या वक्तव्यावर उमेश पाटील म्हणाले..,

उद्या हाेणा-या निवडणुकीत काेण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patilsaam tv

Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : उद्या भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुक हाेत आहे. या निवडणुकीचा प्रचार पहिल्यापासूनच खालच्या स्तरावर गेल्याचे पाहवयास मिळाले. काेठे भांडण तंटा तर काेठे नेत्यांवर पाेरांवर नकाे ती टीका झाला. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात तर दाेन पाटलांनी केलेली भाषण साेलापूरसह राज्यात चर्चेचा विषय ठरली आहेत. (Bhima Sahakari Sakhar Karkhana Election Latest Marathi News)

मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी एका सभेतील भाषणात ही निवडणुक भीमा कारखान्याची (sugar factory) आहे की राजन पाटलाच्या कुटुंबाची आहे हे समजत नसल्याचे म्हटले. राजन पाटलांची प्रचारादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले आमच्या मुलांना बाळं म्हणताहेत, पण आम्ही पाटील आहोत. पाटलांच्या पोरांना लग्नाआधी एवढी बाळं असतात बेट्या म्हणजे तुझ्याएवढी असे पाटील यांनी म्हणातच उपस्थितांनी टाळ्या शिट्या वाजवत दाद दिली.

bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
Pratapgad : अफजल खान, सय्यद बंडा व्यतरिक्त प्रतापगडाच्या पायथ्याशी 'त्या' दाेन कबरी काेणाच्या ?

राजन पाटील म्हणाले त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. अरं आमच्या पोरांना भिती घालतोय. अरे वयाच्या सतराव्या वर्षी (302 कलमं) भोगणारी आमची पोरं आहेत. त्यांना विषय नाही कारखान्याचा त्यामुळे आपला अप्रचार केला जात आहे असे राजन पाटील यांनी नमूद केले.

bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
Accident News : जिवलग मित्रांवर काळाचा घाला, बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

उमेश पाटील संतापले

मोहोळ राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पटालांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटलांनी एका सभेत खरपूस समाचार घेतला. उमेश पाटील म्हणाले पोरांच्या नावाने बापाच बिल फाडत की काय असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्या, शिट्ट्यांचा गजर केला. उमेश पाटील म्हणाले अशा लोकांमुळे पाटील म्हणून घ्यायची लाज वाटू लागली आहे. असंस्कृत आणि विकृत मनोवृत्तीच्या नेता तुम्हांला चालेला का सवाल उपस्थितांसमाेर केला. (Maharashtra News)

bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
आता ढाब्यांवर दारु पिऊन देणे आणि पिणे पडणार महागात; ढाबा चालकासह सात अटकेत, हजाराेंचा दंड वसूल

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे (ncp) राजन पाटील आणि भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या 'भीमा बचाव परिवर्तन पॅनल' विरोधात भाजपचे (bjp) खासदार धनंजय महाडिक यांच्या 'भीमा शेतकरी विकास आघाडी'चा प्रचार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे करीत आहेत. उद्या हाेणा-या निवडणुकीत काेण बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : 'भीमा' वरुन सतेज पाटलांवर धनंजय महाडकांचा गंभीर आराेप
bhima sahakari sakhar karkhana election 2022, rajan patil, umesh patil
Bhima Sahakari Sakhar Karkhana Election : कोल्हापुरातील महाडिकांची तिसरी पिढी राजकारणाच्या आखाड्यात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com