राजकारण फिरणार, भाजपची ताकद आणखी वाढणार; दिग्गज नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात एन्ट्री

kolhapur News : कोल्हापुरात राजकारण फिरलं आहे. शरद पवार गटाच्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
kolhapur politics
kolhapur news Saam tv
Published On

कोल्हापुराती राजकारण पुन्हा फिरणार

शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

समरजीतसिंह यांच्या शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये एन्ट्री

कोल्हापुरातील राजकारणात मोठी घडामोड घडताना पाहायला मिळत आहे. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आज बुधवारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि अजितदादांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलाना दिसत आहे. याची चाहूल लागताच समरजीत घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. कागलमधील राजकीय समीकरण बदलण्याच्या दृष्टीने त्यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे.

कागलमधील शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्यासह त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंह, राजे विरेंद्रसिंह घाटगे, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केलाय. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.

भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, राजवर्धन नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे, भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी नेते उपस्थित होते.

kolhapur politics
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; पक्षातील बडा नेता फोडला

रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

'समरजितसिंह घाटगे यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. भाजपाची विचारधारा गावखेड्यात नेण्यासाठी पोषक वातावरण असून घाटगे यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने काम करायचंय. घाटगेंनी विश्वासाने भाजपामध्ये प्रवेश केला असून त्याला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.

घाटगे यांनी सांगितला पुढचा प्लान

'पक्ष सांगेल, त्यानुसार चालायचे असे आम्ही ठरवले आहे. पक्षाकडून जी काही जबाबदारी सोपवली जाईल ती पार पाडण्यासाठी आम्ही जोमाने काम करून पक्षाची विचारधारा गावागावात, घराघरात पोहचवू, असे समरजीत घाटगे यांनी सांगितले.

kolhapur politics
Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

कुणीकुणी केला भाजपमध्ये प्रवेश?

समरजीत घाटगे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्या शिवानी विजयसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य अनिलकुमार हेगडे, रंजना बापू अस्वले, नगरसेवक दीपक मगर, सभापती शिक्षण समिती अरुण गुरव, महिला बालकल्याण समिती सारिका बारड, नगरसेविका साधना विष्णू पाटील, नगरसेवक सुशांत कालेकर, उमेश सावंत, बाळासाहेब माळी, मेघा गजानन माने, आनंदा पसारे, विजय राजगिरे, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक कैलाश जाधव, सरपंच संभाजी फराकटे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com