Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री

Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाला रामराम ठोकला. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री
Sharad Pawar Saam tv
Published On

Summary -

  • समरजीत घाटगे यांनी शरद पवार गट सोडला

  • आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार

  • मुंबईत रविंद्र चव्हाणांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

  • महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना मोठा धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांनी पक्षाची साथ सोडली असून ते आज भाजपचे कमळ हाती घेणार आहेत. समरजीत घाटगे आज मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यामुळे शेवटच्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. पण अवघ्या काही महिन्यातच ते भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. समरजित घाटगे थोड्या वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. समरजीत घाटगे यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली होती.

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री
Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उलथापालथ होणार, तब्बल ७००० नव्या नियुक्त्या होणार, कुणाला बसणार झटका?

समरजीत घाटगे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपूर्वी सुरू होती. या चर्चांवर त्यांनी शिक्कामोर्तब केला होता. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते की, 'भाजपमध्ये बरेच दिवस माझा भाजपप्रवेश पेंडिंग होता. नगरपालिका आणि विशेषत: जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशननंतर अधिकृत पक्षप्रवेश करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली होती. त्यानुसार ८ तारखेला माझा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.'

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री
Maharashtra Politics: शिंदेसेनेच्या बड्या नेत्याला अटक, बीड पोलिसांची मोठी कारवाई

तसंच, 'माझ्या मूळ पक्षात परत आलोय याचं मला समाधान आणि अभिमान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. मी पक्षातून बाहेर पडून देखील अनेक वेळा त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पुन्हा त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल यात समाधान आहे.', असे समरजीत घाटगे यांनी दिली.

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ; भाजपमध्ये करणार एन्ट्री
Maharashtra Politics: कोकणात ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सोडली साथ; 'धनुष्यबाण' घेणार हाती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com