एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; पक्षातील बडा नेता फोडला

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना मोठा हादरा दिला आहे. शिंदेंनी ठाकरे गटातील बडा नेता फोडला आहे.
Saam tv
eknath news Saam tv
Published On
Summary

निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडींना वेग

एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपसहित ठाकरेंना हादरा

बड्या नेत्यासह शेकडो नेत्यांची शिवसेनेत एन्ट्री

स्थानिक संस्थांच्या निवडणुकीनंतरही राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासहित भाजपलाही मोठा हादरा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला पक्षात प्रवेश दिला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत बड्या नेत्याने शेकडो कार्यकर्त्यांसहित पक्षात शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाचे कोकणातील चिपळूणचे युवासेना विस्तारक, चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खलाटे, उरणचे उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विनोद साबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील निलहोड नगर पंचायतीतील अपक्ष नगरसेवक सुरेंद्र गौतम यांनी समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी चिपळूणमधून विजय शिर्के, ओंकार पंडित, दिप्ती सावंत देसाई, इकबाल बेबल, विराज खताते, समीर कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुराद चौगुले, वहाब बेबल, सुमित भुरण, दिप्ती भुरण यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.

Saam tv
Kalyan : JEE परीक्षा केंद्रावर गोंधळ; विद्यार्थिनीला उशिरा आल्याने प्रवेश नाकारला, २ वर्षांची मेहनत मातीमोल

उरणमध्ये शरद पवार गटाला धक्का

उरणमधील उपसरपंच अमर म्हात्रे, सुनंदा म्हात्रे, संकल्प घरत, नामदेव ठाकूर, अवधेश महतो, उत्तम चिकणे, समर्थ सोळंकी यांनी शिंदे गटाची साथ धरली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम, उपाध्यक्षा बालिका जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तसेच विदर्भातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील तालुका संघटक गजेंद्र काकडे, तालुकाप्रमुख राजेंद्र गिरडकर, नरेश देवगडे, अनिकेत चित्तराम, नरेंद्र हटेले, वासुदेव चरडे, अक्षय कोलते यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय.

Saam tv
Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

कोल्हापुरातील घाटगेंची भाजपमध्ये एन्ट्री

कोल्हापुरातील शाहू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समरजीतसिंह घाटगे यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. विधासनसभा निवडणुकीदरम्यान घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आज बुधवारी त्यांनी पुन्हा भाजपमध्ये ‘घरवापसी’ केली आहे. कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याने कागलमधील राजकीय संघर्ष काहीसा शांत झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असल्याने त्यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com