Ratnagiri News: रत्नागिरीत बॉम्ब तयार करणारे रॅकेट? पोलिसांनी सशंयिताला घेतले ताब्यात

Ratnagiri News: रत्नागिरीत २० गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले आहे
Ratnagiri News
Ratnagiri NewsSaam tv
Published On: 

Ratnagiri News: रत्नागिरीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. रत्नागिरीत २० गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले आहे. रत्नागिरीच्या दापोली पालगडमधून हे २० गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीच्या दापोली-पालगडमध्ये 20 गावठी बॉम्ब पोलिसांनी हस्तगत केले आहे .या प्रकरणी संशयित रमेश पवार याला गावठी बॉम्बसहित दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पालगड तिट्यावर संशयित आरोपी रमेश पवार यांच्या पिशवीत गावठी बॉम्ब होते. या प्ररकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

Ratnagiri News
Pune Crime News: उच्चशिक्षित तरुणीला इंटरव्यूसाठी बोलावलं अन्... धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं

बॉम्ब हस्तगत केल्यानंतर बॉम्बशोधक आणि नाशपथक दापोलीत दाखल झाले आहे. बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्याशी धागेदोरे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आरोपीला कोर्टात हजर जाणार आहे .

Ratnagiri News
Sambhajinagar Crime News: माता न तूं वैरिणी! पोटच्या मुलाला गरम तव्यावर बसवून चटके दिले, उपाशीपोटी घरात कोंडून ठेवले

आरोपी होता पळण्याच्या तयारीत

कोकणात प्रामुख्यानं वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अशा पद्धतीचे गावठी बॉम्ब वापरले जातात. पालगड तिट्यावर संशयित आरोपी रमेश पवार यांच्या हातातील पिशवीत गावठी बॉम्ब आढळून आले. आरोपी बॉम्ब घेऊन बाहेर जाण्याच्या तयारीत होता.

त्यावेळीच पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून गावठी बॉम्बसह आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं. दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पीएसआय महेश पाटील करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com