

Buldhana News Today: खामगाव-शेगाव रोडवर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला धडकली. या भीषण 8 जण गंभीर जखमी झाले असून कार मधील पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या सोबत असलेली 30 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. (Latest Marathi News)
अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेले अरविंद बडगे (40, रा. खामगाव) हे खामगावच्या शिवाजीनगर पोलीस (Police) स्टेशनला कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत सुनीता खराटे (30, रा. शिवाजीनगर, खामगाव) ही महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. या दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अकोट आगाराची बस खामगाव वरून शेगावमार्गे अकोटकडे जात होती. त्यावेळी शेगाववरून येणाऱ्या अरविंद बडगे यांच्या कारने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्य प्रयत्न केला. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अकोट आगाराच्या बसला कारची जबर धडक बसली. (Accident News)
जयपूर लांडे फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कारमधील दोघांसह एसटी बस मधील 8 जण जखमी झाले आहेत. बसमधील जखमींना सामान्य रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी हलविण्यात आले आहेत तर बसमधील पोलीस कर्मचाऱ्यासह महिलेवर खामगावच्या सिल्व्हर सिटी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.