Odisha Bus Accident: ओडिशात २ बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू

Odisha Bus Accident News Today: ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता ओडिशाच्या गंजम येथे आणखी एक भीषण अपघात झाला आहे.
Odisha Bus Accident
Odisha Bus AccidentSaam Tv
Published On: 

Odisha Accident News: ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना ताजी असतानाच आता ओडिशाच्या गंजम येथे आणखी एक भीषण अपघात झाला आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून ८ प्रवाशी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हा भीषण अपघात मध्यरात्री उशिरा झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News

Odisha Bus Accident
Maharashtra Politics: धाराशिव लोकसभेच्या जागेवर काँग्रेसकडून दावा; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

घटनास्थळी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून यात 6 पुरुष, 4 महिला आणि 2 अल्पवयीन आहेत. ओडिशा (Odisha) सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना 30 हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे.

बेरहामपूरचे एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. ओएसआरटीसी बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृत्युमुखी पडलेले बहुतांश प्रवासी खासगी बसमधील होते. (Accident News)

Odisha Bus Accident
Maharashtra Politics: फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

ओएसआरटीसीची बस रायगडाहून भुवनेश्वरला जात होती, तर खासगी बस बेरहामपूरहून जिल्ह्यातील खंडादेउली गावातून लग्नाचे वऱ्हाड घेऊन परतत होती. दिगपहांडी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अनेक प्रवाशांची सुटका केली.मात्र, हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com