Maharashtra Politics: धाराशिव लोकसभेच्या जागेवर काँग्रेसकडून दावा; महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

Political News Today: शिवसेना ( शिंदे गट ) भाजपा नंतर आता महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागेवरून वादाची चिन्ह.
Shivsena Vs Maha Vikas Aghadi
Shivsena Vs Maha Vikas AghadiSaam Tv
Published On

बालाजी सुरवसे

Dharashiv Political News: शिंदे गट आणि भाजप यांच्यानंतर आता महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे असणाऱ्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. (Latest Marathi News)

Shivsena Vs Maha Vikas Aghadi
Maharashtra Politics: फडणवीस, शेलार आमच्या मालकांकडे समर्थनासाठी चपला घासतात, मनसे आमदार राजू पाटील यांची टीका

धाराशिव (Dharashiv) लोकसभेच्या जागेवरती जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे लोकसभा लढवा अशी मागणी केली आहे. कार्यकर्त्यांच्या या मागणीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही समर्थन दिलं आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील महाविकास आघाडीमध्ये वादाची चिन्ह निर्माण झाली आहेत.

ठाकरे गटाचे खासदार असलेल्या ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर काँग्रेसकडून (Congress) दावा केला आहे. त्यामुळे लोकसभेच्या या जागेवरून आता महाविकास आघाडीत वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे सध्या या मतदारसंघाचे खासदार आहेत. (Political News)

Shivsena Vs Maha Vikas Aghadi
Devendra Fadnavis Statement: उद्धवजी माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचा इशारा; म्हणाले, 'ज्यांच्या अलमारीत सांगाडे...'

मात्र हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आतापर्यंत झालेल्या 17 निवडणुकीत 12 वेळा काँग्रेसने ही जागा लढवली असून 11 वेळा ही जागा जिंकल्याचा हवाला देत या जागेवर काँग्रेस कडून दावा करण्यात आला आहे.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील हे या मतदारसंघात निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी प्रदेश काँग्रेसकडे मागणी देखील केली आहे. तसेच आतापर्यंत सर्वाधिक वेळा काँग्रेस या जागेवर विजयी झाल्याचे देखील काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जे आदेश देतील तो शिरसावंद्य असल्याचे सांगत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळरांनी वेळ मारून नेली. मात्र आगामी काळात या जागेवरून महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com