पोलिसांनीच पोलिसाला मारलं; बुलढाण्यात रक्तरंजीत थरार, नेमके काय घडले?

Treasure Hunt Turns Violent: बुलढाणा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून अकोल्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनीच सहकारी पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Injured policeman after a violent clash involving fellow officers in Buldhana district during a late-night investigation.
Injured policeman after a violent clash involving fellow officers in Buldhana district during a late-night investigation.saam tv
Published On

संजय जाधव, साम टीव्ही

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुप्तधनाचा शोध घेण्यावरून झालेल्या वादात चक्क पोलिसांनीच पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Injured policeman after a violent clash involving fellow officers in Buldhana district during a late-night investigation.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

मिळालेल्या माहितीनुसार कवठळ शिवारात काही लोक गुप्तधन शोधत असल्याची माहिती तामगाव पोलिसांना मिळाली होती. या महितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस अंमलदार संतोष आखरे आणि प्रमोद मुळे रात्रीच्या सुमारास घटनास्थळी तपासासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना संशयास्पद असे काहीही आढळले नाही.

Injured policeman after a violent clash involving fellow officers in Buldhana district during a late-night investigation.
Public Holiday: महत्त्वाची बातमी! २३ एप्रिलला सार्वजनिक सुट्टी; या ठिकाणी शाळा, कॉलेज अन् सरकारी कार्यालये राहणार बंद; कारण काय?

तपास करून परत येत असताना, पोलिसांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या. अंमलदार आखरे आणि मुळे यांनी त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वादादरम्यान संशयित आरोपी राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे यांनी संतोष आखरे यांच्यावर हातातील स्टीलच्या कड्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात आखरे यांच्या कपाळावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले दुसरे पोलीस अंमलदार प्रमोद मुळे यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.

Injured policeman after a violent clash involving fellow officers in Buldhana district during a late-night investigation.
Crime : भीम जयंतीनंतर पप्पूची निर्घृण हत्या, घात लावून चाकूने सपासप वार, २ हत्याने महाराष्ट्र हादरला

घटनेनंतर जखमी संतोष आखरे यांनी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले असता, धक्कादायक माहिती समोर आली. हल्ला करणारे दोन्ही आरोपी हे अकोला जिल्ह्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com