Prataprao Pawar: संशोधनाचा उपयोग राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्हावा, पद्मश्री प्रतापराव पवारांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

PCU Innovation Center: पिंपरी चिंचवड विद्यापीठात इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन झाले. संशोधन, स्टार्टअप आणि उद्योग सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
Prataprao Pawar speech
Pimpri Chinchwad University innovationsaam tv
Published On

पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘इनोव्हेशन व उद्योजकता उत्कृष्टता केंद्र’ (Center of Innovation and Entrepreneurial Excellence – CIEE) चे उद्घाटन उत्साहात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन पद्मश्री व डॉ. जी. डी. यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी संशोधनाचा उपयोग समाज, उद्योग आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्हावा असे मत व्यक्त केले. सरकारने संशोधनाला चालना दिल्याने २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Pimpri Chinchwad University innovation
Pimpri Chinchwad University innovationsaam tv

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 'प्रतापराव पवार' तेथे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात फक्त ज्ञान मिळवणं पुरेसं नाही, तर नवकल्पना सादर करून त्या प्रत्यक्षात उद्योगांमध्ये उतरवणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण संस्था, उद्योग आणि संशोधन क्षेत्र यांच्यात मजबूत समन्वय असणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय तरुण संशोधकांमध्ये प्रचंड क्षमता असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी सक्षम इनोव्हेशन इकोसिस्टम तयार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Prataprao Pawar speech
Monday Horoscope: शांत डोक्याने महत्वाची कामे पूर्ण कराल, ५ राशींना मिळणार नव्या संधी; वाचा आजचे राशीभविष्य
Pimpri Chinchwad University innovation
Pimpri Chinchwad University innovationsaam tv

या कार्यक्रमाला डॉ. एस. एस. मंथा, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. गिरीश देसाई, डॉ. संजय सोनवणे तसेच सचिन इटकर यांच्यासह विविध संशोधन संस्था आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतापराव पवार यांनी पुढे सांगितले की, हे केंद्र केवळ शैक्षणिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना समस्या सोडवणारे, स्टार्टअप उभारणारे आणि रोजगार निर्मिती करणारे बनवणारे व्यासपीठ आहे. युरोपियन देशांप्रमाणे भारतातही उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील सहकार्य अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. उद्योगांनी फक्त नोकऱ्या देण्यापुरते मर्यादित न राहता संशोधन, इनक्युबेशन आणि उत्पादन विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pimpri Chinchwad University innovation
Pimpri Chinchwad University innovationsaam tv

बारामती येथे उभारण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स केंद्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रात मोठे बदल घडवून आणले जात आहेत. डेटा आधारित निर्णय प्रक्रिया आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे ग्रामीण व औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळत आहे.

Prataprao Pawar speech
Jio Recharge: खुशखबर! 98 दिवसांची वैधता, दिवसाला 2 जीबी डेटा, Jioच्या या प्लानची किंमत फक्त...

अशा उपक्रमांमुळे देशातील नवोन्मेष अधिक वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, पीसीयूमध्ये संशोधक विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देण्यासाठी देशभरातील नामांकित शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या संकल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर, संशोधनाचे व्यावसायिकीकरण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी संस्थेचा विशेष प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

Pimpri Chinchwad University innovation
Pimpri Chinchwad University innovationsaam tv

सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे, सीओईपी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, आयसीटी मुंबई, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आणि फोर्ब्स मार्शल यांसारख्या आघाडीच्या संस्थांचे सहकार्य या उपक्रमाला लाभत असून, भविष्यात पीसीयू देशातील अग्रगण्य इनोव्हेशन हब म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com