Sakshi Sunil Jadhav
सध्या Jioचे ग्राहक मोठ्या संख्येने वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार रिलायन्स जिओ नवे प्लान सादर करत आहे.
तुम्हाला जिओच्या पोर्टफोलिओमध्ये विविध प्रकारचे प्लान्स दिले आहेत. ज्याच्या किंमती आणि दिवसांची वैधता असते.
पुढे आपण जिओच्या स्पेशल प्लानबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला डेटा, कॉलिंग, एसएमएस अशा सगळ्याच सुविधा मिळणार आहेत.
जिओच्या या प्लान तुम्हाला दिवसाला २ जीबी डेटा मिळणार आहे. तर एकूण यामध्ये १९६ जीबी डेटा मिळणार आहे.
तुम्हाला याच रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिडेट कॉलिंग सुविधा मिळणार आहेत. यामध्ये रोमिंगचा सुद्धा समावेश असणार आहे.
तसेच तुम्हाला दिवसाला १०० एसएमएसची सुविधा मिळेल. म्हणजे एखाद्या वेळेस नेट संपल्यावर तुम्ही यावर चॅटींग करू शकता.
जिओचा हा रिचार्ज प्लान एकूण ९९९ रुपयांचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एकूण ९८ दिवसांची वैधता मिळणार आहे.
जिओ रिचार्ज प्लॅनला "प्रो गूगल जेमिनी" असा टॅग केलं आहे. याचा ॲक्सेस १८ महिन्यांसाठी उपलब्ध आहे, ज्याची किंमत ३५,१०० रुपये आहे.
जिओच्या या रिचार्जसोबत युजर्सना विशेष ऑफर्सही मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ३ महिन्यांच्या जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा समावेश आहे.