Nashik-Mumbai Highway Potholes: नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही रस्त्यांची दैना

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही रस्त्यांवर खड्डे असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Nashik - Mumbai Highway Potholes
Nashik - Mumbai Highway PotholesSaam tv
Published On

Nashik News: नाशिक-मुंबई महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. पेव्हर ब्लॉक टाकून बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांच्या बाजूने नवीन खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही रस्त्यांवर खड्डे असल्याने महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. (Latest Marathi News)

नाशिक मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्ये बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले. परंतु पेव्हर ब्लॉकच्या मलमपट्टीचा काही फायदा झाला नसल्याचे समोर आले आहे .

Nashik - Mumbai Highway Potholes
Mumbai BEST Worker Protest: ...तोपर्यंत मागे हटणार नाही, बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा; आंदोलनाचा दुसरा दिवस

नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे तातडीने आदेश देण्यात आल्यानंतर पेव्हर ब्लॉक टाकून हे खड्डे बुजवण्यात आले. मात्र, ज्या ठिकाणी खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून खड्डे बुजवण्यात आले. त्याचं ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या बाजूने पुन्हा नवीन खड्डे पडल्यानं महामार्ग पुन्हा एकदा खड्ड्यात गेला आहे.

महामार्गावर नाशिक जिल्ह्यात विल्होळी, वाडीवऱ्हे, घोटी, इगतपुरी परिसरात ठिकठिकाणी पुन्हा खड्ड्यांच साम्राज्य पसरलं आहे. पेव्हर ब्लॉक टाकून करण्यात आलेली खड्डे दुरुस्ती निष्फळ ठरली आहे. परिणामी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टोल भरूनही खड्ड्यांमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Nashik - Mumbai Highway Potholes
Vaijapur News: काय सांगता! १५ वर्षाची मुलगी तहसीलदार.. शाळकरी मुलांच्या हातात तालुक्याचा कारभार; अनोख्या उपक्रमाची होतेय चर्चा

मुंबई- नाशिक महामार्गावरून मुख्यमंत्र्यांनी काय निर्देश दिले होते?

मुंबई- नाशिक महामार्गावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रशासनाला निर्देश देताना म्हणाले होते की, 'राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- नाशिक महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे. या कामात विलंब होऊ नये, रस्त्याच्या कामात सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत खबरदारी घ्यावी'. असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com