Vaijapur News: काय सांगता! १५ वर्षाची मुलगी तहसीलदार.. शाळकरी मुलांच्या हातात तालुक्याचा कारभार; अनोख्या उपक्रमाची होतेय चर्चा

Chhatrapati Sambhajinagar News: संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर महसूल प्रशासनाने बुधवारी युवा संवाद कार्यक्रम राबवला, ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar News:
Chhatrapati Sambhajinagar News: Saamtv
Published On

Vaijapur Tahsil Office News: पंधरा वर्षाची तहसीलदार आणि १४ ते १६ वर्षाचे अधिकारी झाल्याचे आत्तापर्यंत कधी ऐकले नसेल. पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये हे चित्र पाहिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण शाळेतल्या विद्यार्थ्यांनी एक दिवस पूर्ण तहसील ऑफिस ताब्यात घेऊन कामकाज पाहिले. या नाविन्यपुर्ण उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News:
Parali Railway Station : परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन

याबाबत अधिक माहिती अशी की, १ ते ७ ऑगस्ट यादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या (Maharashtra Government) महसूल व वन विभागाच्या वतीने राज्यभरात महसूल सप्ताह राबवला जात आहे. या या सप्ताहांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर (Vaijapur Tahsil Office) महसूल प्रशासनाने बुधवारी युवा संवाद कार्यक्रम राबवला. यामध्ये तहसीलदाराच्या खुर्चीवर एका विद्यार्थिनीने समर्थपणे दिवसभर आपली कामगिरी बजावली.

या वेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी वैजापुरातील करुणानिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना तहसील कार्यालयातील कामकाज चालवण्याचा अनुभव दिला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी कनिष्का कल्पेश शेटे हिने तहसीलदारांच्या खुर्चीत बसून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न तहसीलदारांच्या मार्गदर्शनात केला.

Chhatrapati Sambhajinagar News:
Nagpur Crime News: खळबळजनक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार

या वेळी सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिंवसरा यांनी नवनियुक्त तहसीलदाराच्या भूमिकेतील विद्यार्थिनीशी संवाद साधला. तसेच अनुष्का संतोष कावळे हिने नायब तहसीलदार १ यांच्या खुर्चीत बसून कामकाज हाताळण्याचा अनुभव घेतला.

तर स्नेहल निष्णात बागूल हिने नायब तहसीलदार महसूल २, अथर्व नीलेश चव्हाण याने नायब तहसीलदार निवडणूक, प्रथमेश जालिंदर माळवदे याने नायब तहसीलदार संजय गांधी, समृद्धी राजेंद्र महापुरे हिने अकाउंट, रोहित बापू कदम याने अव्वल कारकून पदाचे कामकाज पाहिले. या नाविन्यपुर्ण उपक्रमाची सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com