Parali Railway Station : परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन

Beed News परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन
Parali Railway Station
Parali Railway Station Saam tv
Published On

बीड : बीडच्या परळी रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेतून (Beed) नूतनीकरणासाठी १३ कोटी ५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून परळी (Parali) रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम केले जाणार असून यामुळं स्थानकाचा काहीसा कायापालट होणार आहे. (Latest Marathi News)

Parali Railway Station
Nagpur Crime News: खळबळजनक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार

दक्षिण- मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागात परळीसह १६ रेल्वे स्टेशनचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश केला आहे. रेल्वे स्थानकातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येणाऱ्या ६ ऑगस्टला ऑनलाइन अमृत भारत स्टेशनच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तर परळी येथील रेल्वे स्टेशनवर ६ ऑगस्टला भूमिपूजन सोहळ्याला खासदर प्रीतम मुंडे व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाचे रेल्वे प्रबंधक भरतेश कुमार जैन यांनी पत्राद्वारे दिली आहे.

Parali Railway Station
Raju Shetti यांच्यावर अप्रत्यक्ष घणाघात...'लायकी नसलेल्यांनी आम्हांला शहाणपणा शिकवू नये'; 'स्वाभिमानी' वर रविकांत तुपकरांचा दावा? (पाहा व्हिडिओ)

दरम्यान या योजनेद्वारे रेल्वेस्थानक (Railway) परिसरातील वाहतूक सुधारणा, परिसर सुशोभीकरण, प्रतीक्षागृह उभारणे व सुधारणा, स्वच्छतागृहामध्ये सुधारणा व अन्य विकासकामे होणार आहेत; अशी माहिती रेल्वे वाणिज्य अधिकारी संतोष चिघळे यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com