रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावरील (mumbai goa highway) चिपळूणमधील (chiplun) परशुराम घाट (parshuram ghat) रुंदीकरणाचे काम आजपासून (ता. २५ एप्रिल) २५ मे पर्यंत चालणार आहे. यामुळे महिनाभर सकाळी ११ ते सायंकाळी पाच यावेळेत घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. (parshuram ghat latest marathi news)
यामुळे कामाची गती वाढेल आणि पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण हाेईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबराेबरच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
या घाटातील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याने साधारणपणे एक महिना पीर लोटे मार्ग या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.