sharad pawar
sharad pawarsaam tv

'या' मंदिरात नारळ फुटल्याशिवाय शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात हाेत नाही

मनसे नेते राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर ठाणे येथील उत्तर सभेत वेगवेगळ्या मुद्यांवर टीका केली हाेती.
Published on

बारामती : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) नेते शरद पवार (sharad pawar) हे नास्तिक असल्याची टीका मनसेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी नुकतीच ठाणे येथे केली हाेती. त्यावर मी खरंच नास्तिक आहे का याची चौकशी करा असे शरद पवार यांनी आज म्हटलं. (sharad pawar latest marathi news)

शरद पवार यांनी आज आयाेजिलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या टीकेस गांभीर्याने घेत नाही असं म्हटलं. याबराेबरच मी खरंच नास्तिक आहे का याची चौकशी करा असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांची वर्षानुवर्षे बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीवर श्रद्धा असल्याचं दिसून येते.

sharad pawar
sharad pawarsaam tv
sharad pawar
Kolhapur: राज ठाकरे उत्तम व्याख्याते; मोजक्या शब्दांत शरद पवारांनी घेतला समाचार

शरद पवार हे कन्हेरीच्या मारुती मंदिरातूनच त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचा प्रारंभ करतात. या मंदिरात नारळ फुटल्याशिवाय त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ हाेत नाही असे वर्षानुवर्ष आम्ही पाहिल्याचे ग्रामस्थ सांगतात. दरम्यान केवळ निवडणुकीपुरतं पवार कुटुंब या मंदिरात येतं असं नाही तर वेळ मिळेल तेव्हा पवार कुटुंबीय याच मंदिरात येतात असेही ग्रामस्थांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

sharad pawar
sharad pawarsaam tv
sharad pawar
Sharad Pawar on Raj Thackeray | राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही :शरद पवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com