Parabhani News: सगेसोयरे शब्दाचा अध्यादेश पारित होत नसल्याने तरुणाची आत्महत्या; परभणी जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Maratha Reservartion: मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून प्रताप हा आंदोलनामध्ये सक्रिय होता. त्यात अध्यादेश निघाल्यानंतर सुरू असलेल्या चर्चांमुळे तो व्यतीत झाला.
Maratha Reservartion
Maratha ReservartionSaamtv
Published On

Parabhani News:

सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अशातच सगे सोयरेबाबत सरकारकडून कायदा पारित केला जात नसल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे.

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अध्यादेश काढण्यात आला मात्र त्यात सगेसोयरे हा शब्द देखील टाकण्यात आला परंतु त्यासाठी कायदा पारित करणे गरजेचे आहे हा कायदा राज्य सरकार पारित करत नाही म्हणून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील राजवाडी गावात घडली.

प्रताप दिनकरराव शेवाळे (वय, २५,) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने पळसाच्या झाडाला गळफास घेत आज सकाळी (१०,फेब्रुवारी) आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहली असून त्यामध्ये माझ्या मराठा समाजाला पक्के आरक्षण मिळण्यासाठी सगे सोयरेचा कायदा प्रारित करणे, आवश्यक आहे, मात्र सरकार तो कायदा पारित करत नाही, म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.

Maratha Reservartion
Babri Masjid Brick: बाबरी मशिदीच्या वीटेचं होणार संशोधन; भारत इतिहास संशोधन संस्थेकडून रहस्य येणार बाहेर?

दरम्यान, मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्यापासून प्रताप हा आंदोलनामध्ये सक्रिय होता. त्यात अध्यादेश निघाल्यानंतर सुरू असलेल्या चर्चांमुळे तो व्यतीत झाला. त्यामुळेच त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com