देशात पहिल्यांदाच! आता पाण्याचाही मिळणार 'सातबारा'; पाहा महाराष्ट्र सरकारचा काय आहे प्लॅन

Panyacha satbara : जशी आपल्या जमिनीची मालकी आणि नोंद ओळखण्यासाठी 'सातबारा उतारा' असतो, अगदी त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रात पाण्याचाही सातबारा तयार केला जाणार आहे.
Water reservoir and official land record document symbolizing Maharashtra’s Water Satbara initiative.
Maharashtra government plans India’s first ‘Water Satbara’ system to monitor water usage and availability.AI
Published On

Water Satbara : आपल्या गावात जमीन कोणाच्या नावावर आहे आणि ती किती आहे, हे जसे सातबाऱ्यावरून लगेच कळते. तसेच आता गावात पाण्याचा साठा किती आहे आणि त्याचा वापर कसा होतोय, याची नोंद 'पाण्याच्या सातबाऱ्यावर' ठेवली जाणार आहे. राज्यातील पाण्याची उधळपट्टी थांबवण्यासाठी महसूल विभागाने हा मोठा प्लॅन तयार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 'जल सातबारा' या अभिनव संकल्पनेला विकसित करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केल्यानुसार, पाण्याचा बेसुमार वापर रोखण्यासाठी आणि 'वॉटर इकॉनॉमी' मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार 'वॉटर अकाऊंटिंग फ्रेमवर्क' आणि 'वॉटर बॅलन्सशीट' संकल्पनेवर काम करत आहे. या अंतर्गत पाण्याचे ऑडिट केले जाईल. विकसित महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे बावनकुळे म्हणाले.

गाव व शहरातील पाण्याचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, वापर, गरज लक्षात घेऊन पाण्याचा ताळेबंद तयार करणार असल्याचे समजतेय. शास्त्रीय पद्धती विकसित करून जल सातबाऱ्याची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. एक गाव व नगर परिषदेत हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार आहे, अशी माहिती मिळाली.

Water reservoir and official land record document symbolizing Maharashtra’s Water Satbara initiative.
पुणे हादरले! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे हस्तमैथुन; तरुणीने व्हिडिओ बनवला अन्...

सरकारचा नेमका प्लॅन काय?

महाराष्ट्रात आता जमिनीच्या सातबाऱ्यासारखेच पाण्याचा ही सातबारा निघणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'जल सातबारा' या अभिनव संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीतील जल ७/१२ ह़ देशातील पहिले अभिनव पाऊल ठरेल, असा विश्वास मंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. या उपक्रमात गाव व शहरातील पाण्याचा स्रोत, पाण्याची उपलब्धता, वापर, गरज लक्षात घेऊन पाण्याचा ताळेबंद तयार करण्याची शास्त्रीय पद्धती विकसित करून त्याची प्रायोगिक तत्वावर अमलबजावणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील एक गाव व नगर परिषदेत हा पथदर्शी प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

Water reservoir and official land record document symbolizing Maharashtra’s Water Satbara initiative.
Beed : बीड पुन्हा हादरले! संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती; दोरीने बांधून तरुणाला बेदम मारहाण, दुकानातच केला खून

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com