पुणे हादरले! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे हस्तमैथुन; तरुणीने व्हिडिओ बनवला अन्...

man arrested for obscene act at BRT bus stand : पिंपरी चिंचवडमधील बीआरटी बस स्टँडवर एका माथेफिरू तरुणाने तरुणीसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

गोपाल मोटघरे | पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | साम टीव्ही मराठी

Pimpri Chinchwad latest crime news : पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. शहरातील सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलावरील बीआरटी (BRT) बस स्थानकावर एका माथेफिरू तरुणाने तरुणीसमोर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. एका खाजगी कंपनीत कामाला जाणाऱ्या तरुणीसमोर सार्वजनिक ठिकाणी हा किळसवाणा प्रकार घडला. पीडित तरुणीने दाखवलेल्या धैर्यामुळे आणि पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे अखेर या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ही धक्कादायक आणि संतापजनक घटना २१ मे रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलावरील एम्पायर इस्टेट बीआरटी बस स्थानकावर घडली. पीडित २१ वर्षीय तरुणी एका खाजगी कंपनीत कामाला असून, ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बीआरटी बस स्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती.

Crime News
Crime : संशयाचे भूत डोक्यात शिरले; पतीने पत्नीच्या डोक्यात टीव्ही फोडला, ठाण्यातील भयंकर घटना

सकाळची वेळ असल्याने बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी कमी होती. याचाच फायदा घेत तिथे आधीपासूनच लोखंडी बाकावर बसलेल्या एका माथेफिरू तरुणाने तरुणीला पाहून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्याने तरुणीसमोर हस्तमैथुन करून सार्वजनिक ठिकाणी तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे किळसवाणे कृत्य केले.

Crime News
Pune curfew : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदी, काय सुरू अन् काय बंद?

तरुणीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला प्रकार

या धक्कादायक प्रकारामुळे सुरुवातीला घाबरलेल्या तरुणीने नंतर अत्यंत धाडस दाखवले. तिने तात्काळ आपला मोबाईल काढून या माथेफिरूचे कृत्य कॅमेऱ्यात कैद केले. तरुणीने त्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्या तरुणाने तरुणीला धमकावले आणि तिथून पळ काढला.

Crime News
Accident : आंबेनळी घाटात घाटात स्कॉर्पिओ १८०० फूट दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; नावं आली समोर

आरोपी जाकीर शेख पोलिसांच्या ताब्यात

या विकृत प्रकारानंतर तरुणीने थेट पिंपरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीने दिलेल्या पुराव्यांच्या आणि मोबाईल फुटेजच्या आधारे पिंपरी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हे किळसवाणे कृत्य करणाऱ्या जाकीर शेख याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com