Vitthal Rukmini Wedding: डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण! पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न

Pandharpur Vitthal-Rukmini Wedding on Vasant Panchami: आज वसंत पंचमीच्या मूहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मातेचा विवाहसोहळा संपन्न झाला. याची देही याची डोळा असा अनुभव देणारा हा क्षण होता.
Pandharpur News
Pandharpur NewsSAAM TV
Published On
Summary

विठ्ठल-रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा संपन्न

वसंती पंचमीला पार पडतो विवाह सोहळा

डोळ्याचे पारणे फेडणारा क्षण

भरत नागणे,साम टीव्ही प्रतिनिधी

साक्षात श्रीकृष्णाचं रूप असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा आज पार पडला. दुपारी 12 वाजता विठ्ठल मंदिरामध्ये पारंपारिक पद्धतीने व मोठ्या भक्ती भावाने हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. याची देही याची डोळा असा हा क्षण होता.

विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थित भाविकांनी "या पंढरपुरात...काय वाजत गाजत...सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं ...' या पारंपारिक लोकगीतावर ठेका धारल्याचे पाहायला मिळाले.

Pandharpur News
Vitthal Rukmini : विठुरायाला दोन किलो चांदीचा मुकुट; जालना येथील भाविकाकडून मुकुट अर्पण

माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी. वसंत ऋतूची चाहूल लागते म्हणून माघ महिन्यातील शुद्ध पंचमीला वसंत पंचमी साजरी केली जाते. हाच दिवस.श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा म्हणून साजरा केला जातो. आज याच मुहूर्तावर देवाचा राजेशाही पध्दतीने विवाह सोहळा विठ्ठल मंदिरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाला गुलाल लावून पूजा केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता विवाह सोहळा संपन्न झाला.

Pandharpur News
Mumbai To Pandharpur Travel: मुंबईपासून पंढरपूरपर्यंत कसे पोहोचावे? रेल्वे, बस, कार किंवा विमान कोणता मार्ग सर्वोत्तम?

दुपारी बाराच्या सुमाराला विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मुर्ती सभा मंडपात आणल्या. डोक्यावर पगडी, अंगी सोवळे कपाळी मुंडावळया असा सजलेला देखणा विठूमाऊली आणि पैठणी, अंलकाराने सजलेली रुक्मिणी माता यांच रूप अनेकजण डोळे भरून पाहत होते. मंत्रोच्चार आणि मंगलाष्टके च्या सुमधूर आवाजात उपस्थितानी अक्षता टाकल्या. अशा सुंदर आणि आनंदी वातावरणात हा सोहळा पार पडला.

विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संपूर्ण फुलांनी सजले होते. विठ्ठल रुक्मिणी चा विवाह सोहळा याच देही याची डोळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Pandharpur News
Pandharpur : पंढरपूरमध्ये विठ्ठल- रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com