Vitthal Rukmini : विठुरायाला दोन किलो चांदीचा मुकुट; जालना येथील भाविकाकडून मुकुट अर्पण

Pandharpur News : मनोकामना पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविकांकडून देवाच्या चरणी रोख रक्कम किंवा दागिना स्वरूपात दान केले जात असते. त्यानुसार विठुरायाच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान केले जात आहे.
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यात दिवसेंदिवस सोनं- चांदीच्या दागिन्यांची भर पडू लागली आहे. भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान केले जात असून जालना येथील एका भाविकाने विठुरायाच्या चरणी दोन किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने या भाविकांचा सत्कार करण्यात आला. 

पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त देखील हजारोच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. इतकेच नाही तर श्रद्धेपोटी या भाविकांकडून विठ्ठल चरणी मोठ्या प्रमाणात दान केले जात असते. आषाढी यात्रेदरम्यान एका भाविकांकडून चांदी दरवाजा अर्पण करण्यात आला होता. यानंतर आता जालना येथील भाविकांकडून चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला आहे. 

Pandharpur News
Heavy Rain : अकोला जिल्ह्याला पावसाने झोडपले; गावांमध्ये शिरले पाणी, वाडेगाव ते बाळापुर वाहतूक बंद

२ लाख ११ हजार रुपयांचा मुकुट 

जालना येथील भाविक राजेश किसनलाल लाहोटी यांनी हा दोन किलो चांदीचा मुकुट अर्पण केला आहे. ज्याची किंमत २ लाख ११ हजार रूपये किंमतीचा सुमारे दोन किलो वजनाचा चांदीचा मुकुट विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण केला आहे. किसनलाल लाहोटी हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त आहेत. अनेक दिवसांपासून देवाला चांदीचा मुकुट अर्पण करण्याची त्यांची इच्छा होती. आज अखेर त्यांची ही इच्छा फलद्रूप झाली.

Pandharpur News
Crop Insurance : मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची पिक विम्याकडे पाठ; वर्धा जिल्ह्यातील केवळ ५९ हजार शेतकऱ्यांनी उतरविला विमा

देवाच्या खजिन्यात भर 
देवाला चांदीचा मुकुट अर्पण केल्यानंतर त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान भाविकांनी अर्पण केलेले अनेक सोनं- चांदीचे विविध दागिने देवाच्या खजिन्यात जमा आहेत. यामध्ये आता लाहोटी यांनी देवाला अर्पण केलेल्या दोन किलो चांदीच्या मुकुटाची भर पडली आहे. चांदीचा हा मुकुट अत्यंत सुबक आणि कला कुसर करून तयार करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com