

पंढरपुरातील अपघातात ८ जण दगावले
अपघातातील मृतांची नावे समोर
मृतांमध्ये ६ महिन्यांच्या चिमुकल्याचा देखील समावेश
सोलापूरच्या पंढरपुरात विहिरीत पिकअप कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पिकअपमध्ये एकूण १४ जण होते, त्यापैकी ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. पंढरपूरच्या तांदूळवाडी गावाजवळ घडलेल्या अपघातातील मृतांच्या नावांची यादी समोर आली आहे. मृतांमध्ये ६ महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे.
सोलापुरातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला. मृत भाविक हे पंढरपूरच्या रांजणी गावचे रहिवासी होते. म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनासाठी भाविक गेले होते. सिद्धनाथ मंदिराच्या दर्शनानंतर गावी परतत असताना भाविकांच्या पिकअपचा अपघात झाला. अपघातामधील मृतांची नावे समोर आली आहे.
मृतांची नावे
इंदुबाई दशरथ बावचे, महिला , ६० वय
पुजा अमोल सातोरे, महिला, २३
पुजा बालाजी बावचे, महिला , २७
अश्विनी संदीप बावचे, महिला , २७
अश्विनी संदिप बावचे, महिला , १४
संस्कार संदिप बावचे, पुरुष , १४
संस्कृती संदिप बावचे, महिला, १४
आरव अमोल सातोरे, पुरुष , ८
समर्थ बालाजी बावचे, पुरुष, ६ महिने
शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आर्थिक मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं की, ' सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खासगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
'अपघातातून 7 जणांचे प्राण वाचविण्यात यश आलंय. त्यांच्यावर उपचार केले जाताहेत. जिल्हाधिकारी-पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झालेत. ते स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल', असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
जिल्हाधिकाऱ्यांकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश
पंढरपूर-म्हसवड महामार्गावर झालेल्या अपघातस्थळी सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकी यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या अपघाताच्या त्रिस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला जेवढ्या विहिरी आहेत. त्या विहिरींचा सर्व्हे करून त्या विहिरींना संरक्षण कठडे बसवण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकी यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.