Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

Pandharpur Corridor Row: पंढरपूर कॉरिडॉरला स्थगिती देण्याचा ठराव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील नऊ ऐतिहासिक मठ-मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Pandharpur Corridor Row
PANDHARPUR CORRIDOR CORRIDOR STAYED, CM FADNAVIS APPROVES ₹35 CRORE FOR HISTORIC TEMPLESsaam tv
Published On: 

पंढरपूरमध्ये कॉरिडॉर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. मात्र तेथील काही नेत्यांचा विरोध होत असल्यानं कॉरिडॉरच्या कामाला वेग मिळत नाहीये. दोन दिवसांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी कॉरिडॉरच्या विषयाला स्थगिती दिल्याचा ठराव मंजूर केला. या ठरावामुळे कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झालीय.

Pandharpur Corridor Row
Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

विशेष म्हणजे हा मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक आहे. दरम्यान कॉरिडॉरला स्थगिती देताच राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहरातील नऊ विविध ऐतिहासिक मठ-मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहरातील नऊ विविध ऐतिहासिक मठ-मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय.

Pandharpur Corridor Row
Golden Ring Road: १७३ किमीचा महामार्ग, ८ कमर्शियल हब; नागपूरचा ‘गोल्डन रिंग रोड’ ठरणार गेमचेंजर! कसा असेल मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट?

निधी मंजूर केल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामविकास आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही पंढरपूर कॉरिडॉर होणारच, असे सोशल मीडियातून जाहीर केले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉरिडॉरसाठी थेट निधीची तरतूद करत पंढरपूर कॉरिडॉर होणार असं स्पष्ट केले आहे.

आता थेट मुख्यमंत्र्यांनीच कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या ९ मठ-मंदिरांसाठी ३५ कोटींचा निधी जाहीर केल्याने कॉरिडॉरच्या कामाला लवकरच गती मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘देवा भाऊ सरकार, पंढरीचा ऐतिहासिक वारसा जपणार आणि कॉरिडॉरला मिळणार साज, शेकडो वर्षांचा पंढरीचा इतिहास नव्या रूपात जपला जाणार’ असं म्हटलंय.

शहरातील जी ९ मंदिरे आणि वास्तूंचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे, त्यामध्ये श्रीराम मंदिर-होळकर वाडा(१२कोटी रूपये), द्वारकाधीश मंदिर - शिंदे सरकार वाडा(१२ कोटी रुपये), मल्लिकार्जुन मंदिर(२ कोटी रुपये), ताकपीठे विठोबा मंदिर(२ कोटी रुपये), प्रल्हाद महाराज समाधी(५० लाख रुपये), देहूकर महाराज मठ(१कोटी ५० लाख रुपये), अकरा रुद्र मारुती मंदिर(1 कोटी रुपये), गोपाळ कृष्ण मंदिर(३ कोटी रुपये) आणि जैन मंदिर(२ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com