

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे.
महिला शेतकरी आणि शेतमजुरांचाही आता योजनेत समावेश
१० ते ७५ वर्षे वयोगटातील पात्र सदस्यांना अपघाती मृत्यू किंवा अपंगत्वाच्या परिस्थितीत २ लाखांपर्यंत अनुदान मिळणार
राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना मोठा दिलासा दिला. आता सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जातोय. सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढविण्यचा निर्णय घेतलाय. आता या योजनेत शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. त्याचप्रमाणे आता या योजनेचा लाभ शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही मिळणार आहे.(Gopinath Munde Farmer Accident Scheme Expanded; ₹2 Lakh Aid For Eligible Members)
राज्य सरकारने कर्जबाजारी शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना त्यांना मोठा दिलासा दिलाय. त्याचदरम्यान सरकारनं शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेची व्याप्ती वाढविण्यचा निर्णय घेतलाय. आता या योजनेत शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय. त्याचप्रमाणे आता या योजनेचा लाभ शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबातील प्रत्येक सदस्यालाही मिळणार आहे.
शेती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष राबणाऱ्या भूमिहीन शेतमजुरांना कामाच्या ठिकाणी त्यांना अपघाताचा धोका असतो. यासह तसेच महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकरी म्हणून नोंद होणार आहे. यापार्श्वभूमीवर शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचाही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. यासह शेतकरी, महिला शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबातील १० ते ७५ वर्षे वयोगटातील सर्व सदस्यांचा योजनेत समावेश करण्यात आलाय.
तसेच ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी/भूमिहीन शेतमजूर/महिला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या नावाने ओळखली जाईल. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ असा ५ वर्षांचा असणार आहे. योजनेनुसार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा अपघात होऊन अपंगत्व आले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर संबंधित शेतकरी, शेतमजूर किंवा त्यांच्या कायदेशीर वारसदारांना अनुदान मिळेल.
रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, वीजेचा धक्का बसल्यामुळे अपघात झाला तर, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश व विंचूदंश, नक्षलवाद्यांकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगलीतील मृत्यू किंवा अपंगत्व, आकस्मिक अपघातामुळे झालेला अंतर्गत रक्तस्त्राव, उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल.
परंतु नैसर्गिक मृत्यू, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या, युध्द, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकांकडून खून, गुन्ह्याच्या उद्देसाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, वयोगट १० ते १८ वर्षे दरम्यान वाहन चालवत असताना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अमलाखाली असताना झालेला अपघात आणि मोटार शर्यतीतील अपघातात मृत्यू झाला तर शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही.
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे - २ लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी होणे - २ लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकाणी होणे - १ लाख रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.