Pandharpur Ashadhi Wari : मानाची रुक्मिणी मातेची पालखी व मुक्ताई पालखी पंढरपुरात दाखल

Pandharpur News : साधारण १५ ते २० दिवसांपासून पंढरपूच्या दिशेने पायी वारी करत निघालेल्या मानाच्या पालख्यांचे आता आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आगमन होण्यास सुरुवात झाली
Pandharpur Ashadhi Wari
Pandharpur Ashadhi WariSaam tv
Published On

पंढरपूर : आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर असल्याने पंढरपुरात भाविकांच्या भक्तीचा मळा जमलेला पाहण्यास मिळत आहे. दरम्यान आता पालखी पंढरपुरात दाखल होण्यास सुरवात झाली असून विठुरायाच्या सासुरवाडीची पालखी पहिल्यांदा पंढरपुरात दाखल झाली आहे. या पाठोपाठ संत मुक्ताबाईची पालखी देखील ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपुरात दाखल झाली आहे.  

Pandharpur Ashadhi Wari
Ashadhi Ekadashi : कुंथलगिरीचा प्रसिद्ध पेढा वाढवणार वारकऱ्यांच्या तोंडाची गोडी; आषाढीनिमित्त धाराशिव जिल्ह्यातून जाणार १० टन पेढा

आषाढी वारीची (Ashadhi Wari) आतुरतेने वाट पाहणाऱ्या वारकरी मंडळींचा उत्साह आता द्विगूणिक झाला आहे. साधारण १५ ते २० दिवसांपासून पंढरपूच्या दिशेने पायी वारी करत निघालेल्या  मानाच्या पालख्यांचे आता आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. यात विठ्ठलाच्या सासरची अर्थात रुक्मिणी मातेच्या माहेरची असणाऱ्या कौंडण्यापूर येथील मानाची पालखी आज (Pandharpur) पंढरपुरात दाखल झाली आहे. ७०० किलोमीटरचा प्रवास करत रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा पंढरपूरला आला आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा गजर करत पालख्या दाखल झाल्या आहेत.

Pandharpur Ashadhi Wari
Dhule Accident : रस्त्याने चालणाऱ्या महिलेला दुचाकीची जोरदार धडक; महिला गंभीर जखमी

संत मुक्ताईची पालखी झाली दाखल

यासोबतच मानाच्या संताच्या पालख्यामध्ये असणारी (Muktai Palkhi) संत मुक्ताई यांची पालखी आज पंढरपूर येथे दाखल झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून ३५ दिवसाचा प्रवास करून ही पालखी पंढरपूर येथे दाखल झाली आहे. आता आषाढीच्या वेध लागले असताना पहिल्यांदाच प्रमुख संताच्या पैकी संत मुक्ताई पंढरपूर नगरीत दाखल झाली आहे. ही पालखी आता पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात वास्तव्यास असेल तर बंधू भेटीसाठी ही पालखी १६ जुलैला वाखरी येथे जाईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com