Pandharpur Accident: पंढरपुरात पिकअपचा भीषण अपघात, २२ भाविक गंभीर जखमी

Pandharpur Accident: विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
Pandharpur Accident
Pandharpur Accident Saam Tv
Published On

Devotees Pick-up Vehicle Pandharpur Accident:

विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला अपघात झाला. या अपघातामध्ये २२ जण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना पंढरपूर-सोलापूर मार्गावरील पंढरपूर जवळच्या तुंगत परिसरात घडली. (Latest News)

हाती आलेल्या माहितीनुसार, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातात जखमी झालेले भाविक हे परभणी जिल्ह्यातील पालम येथील आहेत. हे भाविक खासगी पिकअप वाहनाने पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. ते वाहन पंढरपूर जवळ असतानाच वाहनाला अपघात झाला. जखमींना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एसटी बस आणि मालवाहू वाहनाची धडक

बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर रस्त्यावर एसटी बस आणि मालवाहू वाहनाची जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले. बुलढाण्यातील लाखनवाडा ते उदयनगर दरम्यान रस्त्यावर असलेल्या पिंप्री कोरडे गावाजवळ अपघाताची घटना घडली.

पिंपरी कोरडे गावाजवल विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाने एसटी बसला धडक दिली. दरम्यान अपघातग्रस्त झालेल्या बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी प्रवास करत होते. दोन्ही वाहनाचे चालक गंभीर जखमी झालेत. तसेच बस मधील शाळकरी विद्यार्थ्यांसह काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

जळगावात उभ्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक

रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडली. अमळनेर तालुक्यातील गांधली रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ अपघाताची घटना घडली.

अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय ६२) हे पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय ५५) हे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तशृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांची दुचाकी धडकली.

Pandharpur Accident
Buldhana Accident: भीषण अपघात! एसटी बस आणि मालवाहू वाहनाची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांसह प्रवासी जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com