Odisha Major Accident : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या व्हॅनला मंदिराजवळच अपघात; ८ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Odisha Accident News : केंदुझार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 20 वर बालीजोडीजवळ आज सकाळी हा भीषण अपघात झाला. पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते.
Odisha Major Accident : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांच्या व्हॅनला मंदिराजवळच अपघात; ८ जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी
Published On

Odisha Accident News :

ओडिशामधून एक अपघाताची मोठी घटना घडली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या आठ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. केंदुझार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 20 वर बालीजोडीजवळ आज सकाळी हा भीषण अपघात झाला.

पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण आनंदाने घरातून निघाले होते, मात्र या आनंदाचे रूपांतर क्षणार्धात दुःखात झाले. वेगात असणाऱ्या वॅनने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी व्हॅन वेगात होती. सकाळी दाट धुकं असल्याने वाहन चालकाला ट्रक दिसला नसावा असा अंदाज आहे. अपघातात जखमी असलेल्या सर्वांना घटगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. (Latest News Update)

पुण्यात अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गाव ट्रक आणि जीपमध् भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी आहेत. मंचरजवळ पहाटे हा भीषण अपघात झाला आहे.

नाशिकवरुन भोसरीच्या दिशेने जात असताना जीपने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की जीपच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. दाट धुकं असल्याने समोरील ट्रकचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com