Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले

Palghar Crime: पालघरच्या जव्हारमध्ये भयंकर घटना घडली. मित्रानो नाकावर ठोसा मारल्यामुळे पोलिसाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली.
Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले
Palghar CrimeSaam Tv
Published On: 

फैय्याज शेख, पालघर

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेल्या दोन मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दुर्दैवी घटनेत झाले. मित्राने मारलेल्या जोरदार बुक्कीमुळे गंभीर जखमी झालेल्या पोलिसाचा उपचारादरम्यान मृत्य झाला. ज्ञानेश्वर दत्तात्रय गायकवाड (वय ४० वर्षे) असं या पोलिसाचे नाव आहे. या प्रकरणी निलेश अमृत गभाले (वय ३५ वर्षे) याच्याविरोधात जव्हार पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील गोरवाडी परिसरात हेमंत वाघ यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. निलेश गभाले आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. हे दोघेही जिवलग मित्र होते. ज्ञानेश्वर गायकवाड हे मोखाडा येथे पोलिस खात्यात कार्यरत होते तर निलेश गभाले हा ठाणे येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता.

Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले
Crime: ३००८ मेसेज अन् ४२ व्हॉईस कॉल...'तसल्या' ६५ फोटोंच्या बदल्यात 'वॉर प्लान' लीक केल्याचा आरोप; IAF अधिकाऱ्याचं असं फुटलं बिंग

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त निलेश जव्हार येथे आला होता. यावेळी निलेश आणि ज्ञानेश्वर यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी निलेशने ज्ञानेश्वर यांच्या नाकावर जोरात ठोसा मारला. त्यामुळे त्यांचे नाक फुटले आणि ते खाली कोसळले. पडताना त्यांच्या डोक्याला पाठीमागे गंभीर दुखापत झाली. नाकातून आणि डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने रात्री जव्हार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले
Mumbai Crime: मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग

ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यावर जव्हार येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी ७ नोव्हेंबर २०२६ रोजी घोटी येथील एस.एम.डी.टी. हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. याठिकाणी उपचार सुरू असतानाच ११ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. पोलिसाच्या हत्येप्रकरणी त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली.

Crime: मस्करीत मित्राने बुक्की मारली, पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू ; पालघर हादरले
Crime News: दोन वर्षाच्या चिमुकल्यासह आईने विहिरीत घेतली उडी; मायलेकाच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.