दुबईमध्ये भव्य दिवाळी सोहळा, महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला हजारो मराठी रसिकांची उपस्थिती; अवधूत गुप्तेंच्या गाण्यांची मैफील रंगली

Maharashtra Mandal Dubai Diwali celebration : दुबईतील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित ‘नाद जल्लोष’ दिवाळी सोहळ्याला एक हजाराहून अधिक मराठी बांधवांची उपस्थिती लाभली.
Maharashtra Mandal Dubai events
Maharashtra Mandal Dubai eventsSaam tv
Published On: 

Maharashtra Mandal Dubai events : मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेचा जागतिक स्तरावर प्रसार करणाऱ्या महाराष्ट्र मंडळ (Marathi Parties and Functions Services), दुबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य दिवाळी सोहळा शनिवार, ७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुबईतील प्रतिष्ठित कॉनरॅड हॉटेलमध्ये अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. ‘नाद जल्लोष’ असे या सोहळ्याचे नाव असून, या कार्यक्रमाला एक हजाराहून अधिक मराठी बांधव, कुटुंबीय आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली.

अनिल देशपांडे, विजय धवंगळे, दुबईतील भारताचे माननीय कॉन्सुल जनरल HE Dr. E. Vishnu Vardhan Reddy, महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय भांगे तसेच अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनाच्या मंगलमय वातावरणात दिवाळीच्या आनंदोत्सवाला सुरुवात झाली.

Maharashtra Mandal Dubai Diwali celebration
Maharashtra Mandal Dubai Diwali celebration

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांची बहारदार संगीत मैफल. आपल्या दमदार आवाजाने, खास शैलीतील सादरीकरणाने आणि लोकप्रिय मराठी गीतांनी त्यांनी उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जोशपूर्ण आणि उच्च स्वरातील गाण्यांना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने, सुरांच्या तालावर आणि जल्लोषाने भारावून गेले. मराठी संगीताचा हा अविस्मरणीय अनुभव उपस्थितांसाठी दिवाळीची खास मेजवानी ठरला.

Maharashtra Mandal Dubai Diwali celebration
Maharashtra Mandal Dubai Diwali celebration
Maharashtra Mandal Dubai events
Mumbai police : आजारपणाच्या वेदना असह्य, पोलीस शिपायाने टोकाचा निर्णय घेतला; २ चिमुकल्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले

या कार्यक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक दिवाळी अंकाचे ‘मरुगंध’ या विशेषांकाचे प्रकाशन. दुबई आणि उत्तर अमिरातीतील मराठी समाजाचे साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रतिबिंब या दिवाळी अंकातून मांडण्यात आले आहे. परदेशात राहूनही मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृती यांचे जतन व संवर्धन करण्याच्या मंडळाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे प्रतीक आहे.

Maharashtra Mandal Dubai events
Ladki Bahin Yojana : दिवाळी संपली, लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० कधी येणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत नवीन अपडेट

एक हजाराहून अधिक मराठी बांधवांची उपस्थिती, मान्यवरांचा सहभाग, ‘मरुगंध’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि अवधूत गुप्ते यांच्या संगीत मैफिलीने सजलेला हा सोहळा केवळ दिवाळीचा उत्सव न राहता, दुबईतील मराठी समाजाच्या एकतेचा, सांस्कृतिक अभिमानाचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा भव्य उत्सव ठरला. ‘एकतेचा संग, महाराष्ट्राचा रंग’ या भावनेला साजेसा असा हा दिवाळी सोहळा उपस्थितांच्या मनात अविस्मरणीय आठवणी निर्माण करून यशस्वीरीत्या संपन्न झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.