कांद्यानं कापला शेतकऱ्याचा खिसा; कांदा उत्पादकांचं हजारो कोटींचं नुकसान

maharashtra farmer issue : राज्यात कांदा उत्पादकांची क्रूर थट्टा सुरु आहे. एका शेतकऱ्याला केवळ ५० पैशांचा भाव मिळालाय. या शेतकऱ्याला कांदा विकण्यासाठी खिशातून पैसे द्यावे लागले आहेत? कुठला आहे हा शेतकरी आणि त्याची कांदा विकताना कशी थट्टा झालीय पाहूयात हा रिपोर्ट...
maharashtra farmers
onion Saam tv
Published On

कांदा उत्पादकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यात शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून १२३५ रुपये क्विंटलनं कांदा खरेदी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काही मिळण्याऐवजी उलट कांदा विक्रीतून त्यांचा खिसा कापला जातोय. बीड जिल्ह्यातील धारूर येथील शेतकरी संतोष शिनगारे यांनी मोठ्या आशेने आपला कांदा सोलापूर मार्केटला आणला. कांदा विकून उत्पादन खर्च सोडा त्यांना आपल्या खिशातून पैसे टाकावे लागले. कांदा विक्रीचं गणित पाहूया...

संतोष शिनगारे यांनी 6 क्विंटल 2 किलो कांदा 50 रुपये क्विंटलनं विकला. याचे त्यांना 1 हजार 538 रुपये मिळाले. मात्र

12 पोत्यांची किंमत - 456 रुपये

वाहतूक भाडं - 1200 रुपये

हमाली - 62 रुपये

तोलाई - 37 रुपये

वारणी - 60 रुपये

इतर खर्च - 24 रुपये

असा एकूण खर्च 1839 रुपये आला. त्यांना आपल्या खिशातून 301 रुपये द्यावे लागले.

maharashtra farmers
Onion Farmers Protest: कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; कांदा उत्पादकांना हवा अडीच-3 हजारांचा दर

रब्बी हंगामात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोव्हेंबरपासून कांद्याचे दर सातत्याने उत्पादन खर्चापेक्षा कमी राहिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्याला चार महिन्यात 400 कोटींचा तोटा झाला आहे. केंद्र सरकारचा निर्यातबंदी आणि ग्राहकधार्जिण्या धोरणाचा मोठा फटका बसल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होतेय.

maharashtra farmers
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप, कांद्याला 50 पैसे किलोचा भाव

दुसरीकडे अहिल्यानगरच्या श्रीरामपूर बाजार समितीत कांद्याला ३ रुपये ८० भाव मिळाला आहे. कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकरी संघटनेने आक्रमक होत बाजार समिती प्रशासनाला धारेवर धरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्येही कवडीमोल भाव मिळत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमधील लिलाव बंद पाडलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com