Bhimashankar News : भाविकांनाे! भिमाशंकरला निघालात? थांबा... पुढं रस्ता खचलाय; जाणून घ्या पर्यायी मार्ग

Adhik Mahina : अधिक महिन्यातील दूसरा साेमवार असल्याने भिमाशंकरला जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे.
manchar to bhimashankar road paved
manchar to bhimashankar road paved saam tv
Published On

Bhimashankar Road Closed : मंचर भिमाशंकर मार्गावर शिनोली शिंदेवाडी रोड खचल्याने भिमाशंकरला जाणा-या भाविकांची माेठी अडचण झाली आहे. या रस्त्यावरील वाहतुक एकेरी सुरु आहे. भाविकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पाेलिसांनी केले आहे. (Maharashtra News)

manchar to bhimashankar road paved
Ambenali Ghat : आंबेनळी घाट 15 दिवस वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधिका-यांचा आदेश

पुणे नाशिक महामार्ग असाे अथवा मंचर - भिमाशंकर रस्ता असाे या दाेन्ही रस्त्यांवर भिमाशंकरला जाण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. त्यातच मंचर भिमाशंकर मार्गावर शिनोली शिंदेवाडी रस्ता खचला आहे. या रस्त्याचे काम सुरु असताना रस्ता खचल्याने वाहनधारकांची अडचण झाली आहे.

manchar to bhimashankar road paved
Sangli News : संभाजी भिडेंवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, सांगलीतून मागणी

एकेरी वाहतुक

आधिक श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार असल्याने भिमाशंकर मार्गावर गर्दी पाहावयास मिळत आहे. भिमाशंकर मार्गावरील मुख्य रस्ता खचल्याने वाहतुक कोंडी झाली आहे. घोडेगाव पोलिसांनी सध्या एकेरी वाहतुक सुरु करुन वाहतुक कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

manchar to bhimashankar road paved
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

पर्यायी मार्ग

भिमाशंकरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे. त्यानूसार राजगुरुनगर मार्गे वाडा डेहेणे मार्गे भिमाशंकर येथे देखील भाविकांना जाता येणे शक्य आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com