Loksabha Election: पहिलवान तयार! धाराशिवमध्ये ओमराजे नाईक निंबाळकरांना अजित पवार गटाच्या सुरेश बिराजदारांचे आव्हान?

Maharashtra Politics: धाराशिवमध्ये लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाईल. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दंड थोपटले आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaamtv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव|ता. ११ फेब्रुवारी २०२४

Dharashiv Loksabha Election:

राज्याच्या राजकारणात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. धाराशिवमध्ये लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली जाईल. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दंड थोपटले आहेत.

"ओमराजेंना सांगा पहिलवान तयार आहे असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन प्रा.सुरेश बिराजदार यांनी धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Naik Nimbalkar) यांना थेट आव्हान दिले आहे. ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांनी विरोधकांना तुमचा पहीलवान तरी आखाड्यात उतरवा असे आवाहन केले होते.

यावर बिराजदार यांनी महायुतीकडून लोकसभा निवडणुक लढवण्याची थेट इच्छा व्यक्त केली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कामाला लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा अशा सुचना दिल्याचे देखील बिराजदार यांनी सांगितले. त्यामुळे धाराशिवची जागा ही महायुतीकडुन अजित पवार गटाला सुटणार का असा चर्चेंना उधाण आल आहे.

Maharashtra Politics
Lok Sabha Election: शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच; उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला वेग

शिर्डी लोकसभेत काँग्रेस- ठाकरे गटात रस्सीखेच...

शिर्डी लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या निष्ठावान आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

अशातच उध्दव ठाकरे दोन दिवसीय शिर्डी लोकसभेच्या दौऱ्यावर येत असल्याने या जागेवर ते आपली दावेदारी अधिक प्रबळ करतात की काँग्रेस ही जागा मिळवण्यात यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics
Sangli News: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपची एन्ट्री; स्वबळाचा नारा देत उमेदवारी केली जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com