Sangli News: सांगली लोकसभेच्या आखाड्यात रासपची एन्ट्री; स्वबळाचा नारा देत उमेदवारी केली जाहीर

Lok Sabha Election 2024: नुकतीच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
Sangli News
Sangli NewsSaam TV
Published On

Rashtriya Samaj Paksha:

सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आले आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे.

Sangli News
Pitru Paksha 2023 : एपीएमसीत भाज्यांचे दर कडाडले! वाटाणा 150 रुपयांवर, मेथीने गाठली पन्नाशी

सांगली लोकसभा मतदार संघात सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कालिदास गाढवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कालिदास गाढवे हे उच्चशिक्षित तरुण आहेत. नुकतीच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे. प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाढवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

त्यामुळे कालिदास गाढवे यांनी लोकसभा निवडणूक घडवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे.

माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

Sangli News
Shahada Crime : मोटारसायकलच्या डिकीत ठेवलेले अडीच लाख केले लंपास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com