Lok Sabha Election: शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच; उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला वेग

Shirdi Lok Sabha Election: उमेदवारी निश्चित मानून वाकचौरे गावोगावी गाठीभेटी घेत आहेत. 2009 साली वाकचौरे यांनी शिर्डी मतदासंघांत रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यामुळे जनता पुन्हा माझ्यामागे उभी राहिल असा विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केलाय.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSaam TV
Published On

सचिन बनसोडे

Shirdi Political News:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे १३ ते १४ फेब्रुवारी अशा दोन दिवसीय शिर्डी लोकसभा मतारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र तत्पूर्वीच शिर्डी लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही गटाकडून शिर्डीच्या जागेवर दावा केला जात आहे.

Lok Sabha Election
Maharashtra Politics: पालक मला मतदान करत नसतील तर उपाशी राहा; शिंदे गटाच्या आमदाराचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला

शिवसेनेचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेले असले तरी देखील ठाकरे गटाने शिर्डीच्या जागेवर दावा कायम ठेवला आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी निश्चित मानून वाकचौरे गावोगावी गाठीभेटी घेत आहेत. 2009 साली वाकचौरे यांनी शिर्डी मतदासंघांत रामदास आठवले यांचा पराभव केला होता. त्यामुळे जनता पुन्हा माझ्यामागे उभी राहिल असा विश्वास वाकचौरे यांनी व्यक्त केलाय.

काँग्रेस देखील गेल्या अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभा मतारसंघात निवडणूक लढवत आले आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र असले तरी काँग्रेसने देखील शिर्डी लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसच्या निष्ठावान आणि राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते यांनी लोकसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

त्या देखील गेल्या काही दिवसांपासून शिर्डी लोकसभेअंतर्गत येणारे सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. घरोघरी जाऊन रूपवते नागरिकांशी संवाद साधत असून काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित मानून त्या कामाला लागल्या आहेत.

जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसला तरी शिर्डी लोकसभेत काँग्रेसला अनुकूल वातावरण असून आम्ही या जागेसाठी आग्रही असल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील म्हटलं आहे.

शिर्डीच्या जागेवरून महविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच उध्दव ठाकरे दोन दिवसीय शिर्डी लोकसभेच्या दौऱ्यावर येत असल्याने या जागेवर ते आपली दावेदारी अधिक प्रबळ करतात की काँग्रेस ही जागा मिळवण्यात यशस्वी होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Election
Crime News: घातपाताचा संशय! मिठात पुरलेला युवकाचा मृतदेह 42 दिवसांनी काढला बाहेर, सातपुड्यातील खळबळजनक घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com