Maharashtra Politics: पालक मला मतदान करत नसतील तर उपाशी राहा; शिंदे गटाच्या आमदाराचा शाळेतील विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Santosh Bangar News: संतोष बांगर यांनी शाळेतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला. निवडणुकीत तुमचे पप्पा दुसरीकडे मतदान करत असतील तर तुम्ही दोन दिवस जेवणच करू नका.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam TV
Published On

संदीप नागरे

Santosh Bangar:

बाजार समितीच्या निवडणुकीत हरलो तर मिशी कापणार, 2024 मध्ये मोदी पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात गळफास घेणार, आमचे सरकार पुन्हा एकदा आले तर पोलिसांना भगव्या टोप्या घालणार , मी गणपतीला नवस बोललो होतो म्हणून आमदार झालोय, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी देखील मी आता नवसाचा मोदक घेतलाय. ही वक्तव्य ऐकली की, ही वक्तव्य हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचीच असल्याचे लहान मुलं देखील पटकन सांगतात.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: विकासावर बोला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरुन शिंदे गटाचे टीकास्त्र

या सगळ्या वक्तव्याने चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मतदान मिळणार नाही, याची चांगलीच धास्ती घेतली आहे. याला कारण ठरलाय संतोष बांगर यांचा जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांशी झालेला संवाद.

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील लाख शाळेतील विकास कामांच्या भूमिपूजनाला उपस्थित झालेल्या संतोष बांगर यांनी शाळेतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना अजब सल्ला दिला. निवडणुकीत तुमचे पप्पा दुसरीकडे मतदान करत असतील तर तुम्ही दोन दिवस जेवणच करू नका. मम्मी पप्पा ने विचारलं का जेवण करायचं नाही तर सांगा आमदार संतोष बांगर यांना मतदान करायचं, तेव्हाच मी जेवन करतो. नाही तर करणार नाही, असे एकदा नव्हे तीन वेळा विद्यार्थ्यांकडून बांगर यांनी आपल्याला मतदान होईल यासाठी हमी घेतली.

या आधी देखील कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा व माळधामनी गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना राजकीय पक्षांच्या नावाने संतोष बांगर यांनी घोषणा द्यायला लावल्या होत्या. वादग्रस्त वक्तव्य मारहाणीच्या घटना आणि आमदार संतोष बांगर हे समीकरण झालंय. आठवडा उलटला की संतोष बांगर अशा प्रकारची कृत्ये करत असल्याचं या अगोदरच्या घटनांनी अधोरेखित केलं आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: विकासावर बोला, सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नका; आदित्य ठाकरेंच्या कल्याण दौऱ्यावरुन शिंदे गटाचे टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com