Parbhani News : आता तरी सुधरा बे ! नेटीझन्स एसटी महामंडाळावर चिडले, पण का... पाहा व्हिडिओ

MSRTC Bus Video Viral : प्रवाशांचा प्रचंड विश्वास एस.टी. महामंडळावर असल्याने या बसला नेहमीच गर्दी असते.
parbhani, msrtc news, msrtc bus, passengers
parbhani, msrtc news, msrtc bus, passengerssaam tv
Published On

Parbhani News : जगात जर्मनी अन.. भारतात परभणी.. या युक्तीचा प्रत्येक वेळेस महाराष्ट्राला अनुभव आला आहे. आता पुन्हा याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गंगाखेड आगाराची बस लोहा येथून गंगाखेड कडे येत असताना प्रवाशांना चक्क बसमध्ये मांडी घालून प्रवास करावा लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  (Maharashtra News)

parbhani, msrtc news, msrtc bus, passengers
Rajula Hidami Success Story : दादा, मला पाेलिस व्हायचे आहे ! वाचा, माओवादी छावणीतून सुटका ते बारावीपर्यंतचा राजूला हिदामीचा प्रवास

गंगाखेड आगाराची बस (msrtc bus) क्रमांक एम.एच.20 डी. 9886 गंगाखेड ते लोहा व लोहा येथून गंगाखेड येथे परतीचा प्रवासासाठी बस निघाली. प्रवाशांचा प्रचंड विश्वास एस.टी. महामंडळावर असल्याने या बसला नेहमीच गर्दी असते.

parbhani, msrtc news, msrtc bus, passengers
Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

त्यामुळे नेहमीप्रमाणे प्रवाशांनी लोहा बस स्थानकातून गंगाखेड येथे जाणाऱ्या बस मध्ये प्रवेश केला. परंतु बस मध्ये काही आसन वगळता अनेक ठिकाणी प्रवाशांसाठी असणारे आसन उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना चक्क मांडी घालून प्रवास करावा लागला.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (msrtc) प्रवाशांची अशी अवहेलना करत असल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. प्रवाशांनी वाहक व चालक यांना तक्रार बुक विचारले असता त्यांच्याकडे तक्रार पुस्तिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. प्रवाशांची प्रवासादरम्यान अशीच अवहेलना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून होणार आहे का, असा प्रश्न प्रवासी वर्ग विचारु लागला आहे.

parbhani, msrtc news, msrtc bus, passengers
Tomato Price Hike : टाेमॅटाे भाव खाऊ लागताच 400 किलाेंवर चाेरट्यांनी मारला हात; पाेलिस तपास सुरु

दरम्यान प्रवाशांना (passengers) चक्क मांडी घालून प्रवास करावा लागल्याचा व्हिडिओ व्हायरल हाेऊ लागला आहे. हा व्हिडिओ अनेकांनी समाज माध्यमातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास आता तरी सुधरा अशी खाेपरखळी मारु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com