मंत्री नितेश राणेंना एक महिन्याचा कारावास, राज्याच्या राजकारणात खळबळ

मंत्री नितेश राणे यांना 2019 च्या चिखलफेक प्रकरणात एक महिन्याचा कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
Maharashtra minister Nitesh Rane reacts after court verdict sentencing him to one month in jail in the 2019 mud attack case.
Maharashtra minister Nitesh Rane reacts after court verdict sentencing him to one month in jail in the 2019 mud attack case.saam tv
Published On

विनायक वंजारे, साम टीव्ही

सिंधुदुर्ग: राज्यातील फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१९ मध्ये सरकारी अधिकाऱ्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी कलम ५०४ अंतर्गत दाखल गुन्ह्यात कोर्टानं त्यांना दोषी ठरवलं आहे. तर इतर सर्व गुन्ह्यांतून राणेंसह त्यांच्या सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.चिखल फेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेकला होता. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

Maharashtra minister Nitesh Rane reacts after court verdict sentencing him to one month in jail in the 2019 mud attack case.
Manohar Bhosale: भोंदू मनोहर मामाचा नवा करनामा; प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

नेमके प्रकरण काय?

कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिखलमय झाली होती. त्यावेळी अभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारत शेडेकर यांच्यावर चिखल फेक आणि मारहाण करण्यात आल्याची शेडेकर यांनी तक्रार केली होती. त्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर 353, 332, 504, 506 कलमानुसार गुन्हा दाखल झाला होता. यातील 504 कलमा अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग प्रकरणी नितेश राणे यांना एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रूपये दंड सुनावण्यात आला आहे.

Maharashtra minister Nitesh Rane reacts after court verdict sentencing him to one month in jail in the 2019 mud attack case.
Marathi Actor On Manohar Mama: भोंदू मनोहर मामाचं मराठी टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन? या मराठमोळ्या अभिनेत्याने केला मोठा आरोप

तर इतर सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार अशी माहीती नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com