Malegaon Blast Case Verdict: मोठी बातमी: २००६ मधील मालेगाव स्फोटातील ४ आरोपींची निर्दोष सुटका

Malegaon Blast Case Verdict: २००६ मधील मालेगाव स्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. एनआयएला एकही प्रत्यक्षदर्शी न्यायालयात सादर करता आला नाहीये.
Malegaon Blast Case Verdict:
Bombay High Court delivers key verdict acquitting four accused in the 2006 Malegaon blast case.saam tv
Published On
Summary
  • चार आरोपींची निर्दोष सुटका

  • एनआयएला प्रत्यक्षदर्शी सादर करण्यात अपयश

  • ३१ जणांचा मृत्यू झालेल्या स्फोटाचा खटला संपुष्टात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या खटल्यातील चार आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. या चार आरोपींविरीधातील आरोप निश्चित करण्याचा सत्र न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. २००६ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेले राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया यांच्याविरोधातील खटला संपुष्टात येणार आहे.

Malegaon Blast Case Verdict:
प्रशांत वाघमारे यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका; 20,00,00,00,000 रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी होणार, काय आहे प्रकरण?

या खटल्याच्या सुनावणीवेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोर्टात ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा करणारी एकही व्यक्ती सादर करता आली नाही. त्याबाबत आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता. २००६च्या मालेगावात झालेल्या चार स्फोटांमध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात ऑक्टोबर महिन्यात विशेष सत्र न्यायालयाने हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच युएपीए अंतर्गत आरोप निश्चित केले होते. मात्र आरोप निश्चित करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

Malegaon Blast Case Verdict:
Political News : भाजप नेत्याला मोठा दिलासा, बलात्कार प्रकरणात कोर्टाकडून क्लीन चिट; नेमकं काय घडलं होतं?

२००८ मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं एनआयएच्या विशेष न्यायालये म्हटलं होतं. १००० पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने ३१ जुलै २०२५ ला निकाल सुनावण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com