Nitesh Rane
Nitesh Rane Saam TV

Nitesh Rane : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊतील फोटो-व्हिडीओबाबत नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले...

SUdhakar Badgujar News : ACB कडून दाखल गुन्ह्यात आज सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी होणार आहे. फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या दाखल गुन्ह्यात ACB ने बडगुजर यांना दिलेली मुदत संपली आहे.
Published on

Nashik News :

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊमधील कथित फोटो व्हायरल झाले होते. या व्हायरल फोटोंबाबत भाजप आमदार नितेश राणे यांनी धक्कादायक दावा केला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या मुलाने हे फोटो काढल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांचे मकाऊच्या कॅसिनोमधील फोटो संजय राऊत यांनी ट्वीट केले होते. कॅसिनोमधील फोटोंमुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर राजकीय आरोप झाले होते. सुधाकर बडगुजर यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईमागे यासह इतरही काही कारणे असल्याचं सूचक वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. (Latest Marathi News)

Nitesh Rane
Ramdas Athawale: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं मराठा आरक्षणावर मोठं विधान, मनोज जरांगेंनाही दिला महत्वाचा सल्ला

सुधाकर बडगुजर यांची एसीबी चौकशी

ACB कडून दाखल गुन्ह्यात आज सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी होणार आहे. फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या दाखल गुन्ह्यात ACB ने बडगुजर यांना दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे आज बडगुजर यांना ACB कार्यालयात चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे.

ACB चे वरिष्ठ अधिकारी बडगुजर यांची चौकशी करणार आहेत. २०१६ साली तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी बडगुजर यांच्या विरोधात तक्रार दिली होती. नगरसेवक असताना पदाचा दुरुपयोग करून स्वत:च्याच कंपनीला कंत्राट देऊन ३३ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली होती.

Nitesh Rane
Abhijit bichukale: माझं नाव शाहरुख, सलमान, बच्चन यांच्यासोबत घ्या; गौतमीवरील प्रश्नावर बिचुकलेंचे एका वाक्यात उत्तर

सलीम कुत्तासोबतचे व्हिडीओ व्हायरल

तर दुसरीकडे सलीम कुत्ता सोबतचे बडगुजर यांचे फोटो, व्हिडिओ २४ मे २०१६ तारखेचे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या नावावर असलेल्या आडगावच्या फार्महाऊसवर झालेली जंगी पार्टी सलीम कुत्तासाठीच असल्याचं काही साक्षीदारांनी पोलिसांना जबाब दिल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com