संजय राठोड, यवतमाळ
राज्यात आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्याचं वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. याच मराठा आरक्षणाच्या मागणीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे.'मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री आठवले यांनी दिला आहे. (Latest Marathi News)
केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज गुरुवारी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणासहित राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
'मराठा समाजातील गरिबांना आरक्षण मिळावे. सर्वच मराठा समाजातील लोक श्रीमंत नाहीत. जरांगेच्या मागणीप्रमाणे सरसकट दाखले देऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमचा जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा आहे. परंतु, जरांगे यांनी राज्य सरकारला वेळ द्यावा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मंत्री रामदास आठवले यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभा स्मोक कँडल फोडल्याप्रकरणावरही आठवले यांनी भाष्य केलं. 'दिल्लीत अधिवेशन सुरू असताना तरुणांनी संसदेत उड्या मारल्या. इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. प्रेक्षक गॅलरीची उंची कमी आहे. सुरक्षा यंत्रणेकडून मोठी चूक झाली. तरुणांनी आंदोलनासाठी चुकीची तारीख निवडली. याच दिवशी पाकिस्तानच्या दहशतवाद्यानी संसद भवनात हल्ला केला होता,असंही आठवले म्हणाले.
'नवीन संसद भवनाला 'संविधान सदन' असे नाव देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संविधानावर विश्वास आहे. त्यामुळे संविधान बदलले जाणार नाही. विरोधकांकडून जाणीवपूर्वक खोटा आरोप केला जात आहे. विरोधकांकडून जाणीवपूर्वक समाज तोडण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप आठवले यांनी विरोधकांवर केला.
'देशात जातीभेद निर्मुलनाचा प्रयत्न होत आहे. रोटी-बेटीचे व्यवहार होत आहे. ग्रामीण भागात काही प्रमाणात जातीभेद दिसतो. एका जातीने दुसर्या जातीवर अन्याय करू नये. पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेल्या योजनांचा सर्वच जाती-धर्माच्या लोकांना फायदा झाला आहे. केंद्र सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, असंही आठवले यांनी स्पष्ट केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.