जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; नवऱ्याला ७ वर्षांचा तुरुंगवास, सासरच्या मंडळीची निर्दोष मुक्तता, कोर्टात नेमकं काय घडलं?

akola women ends life case : जयश्री नागे आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला आहे. कोर्टात आरोपी पतीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
akola latest news
akola news Saam tv
Published On
Summary

अकोला विवाहित महिला आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट

कोर्टाकडून पतीला ७ वर्षांचा तुरुंगवास

सासरची मंडळीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोल्यात निवडणुकीसाठी 5 लाख आणण्याच्या तगाद्यामुळे एका नवविवाहितेने आत्महत्या केल्याचं प्रकरण. जयश्री नागे असे मृत विवाहितेचे नाव होत. तर आशीष नागे असं आत्महत्याच कारणीभूत ठरलेल्या पतीचे नाव. अखेर अकोला जिल्हा न्यायालयाने जयश्रीच्या आत्महत्या प्रकरणी आरोपी पती आशिष नागेला 7 वर्षाची शिक्षा सुनावली. तर सासरचे अन्य 4 जणांना पुराव्या अभावी कोर्टाने केले निर्दोष मुक्त.

पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 लाख माहेरहून आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. सासरच्या या छळाला कंटाळून विवाहिता जयश्री हिने माहेरी केली आत्महत्या होती.

नेमकी काय सुनावली शिक्षा?

कोर्टात अप.क. २१९/२०२२ कलम ४९८ (अ), ३०४ (ब), ३०६, ५०४, ३४ गुन्ह्यांमध्ये आरोपी विरूद्ध महत्वपूर्ण निकाल दिला. आरोपी आशिष वसंतराव नागे यास कलम आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी ठरवत ७ वर्ष सक्त मजुरी आणि १ रुपये दंड व भादवि कलम ४९८ (अ) मध्ये १ वर्ष सक्त मजुरी व ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

akola latest news
खळबळजनक! अल्पवयीन मुलाचा शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

वंचितच्या माजी सभापतीसह पंचायत समिती माजी सदस्याची निर्दोष मुक्तता.

या प्रकरणामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. कारण, याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या लोकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले जयश्री हिचे सासरे आणि अकोला पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव नागे यांचा समावेश होता. तर सासू वंचितच्या माजी पंचायत समिती सदस्य शोभा नागे यांचा समावेश देखील समावेश होता. मात्र न्यायालयाने त्यांची पुरावी अभावी निर्दोष मुक्तता केली.

जयश्रीजवळच्या पेन ड्राईव्हमुळे उघड झालं होतं सत्य

जयश्री नागे हिने अकोल्यातील पैलपाडा येथील सासरच्यांनी कशाप्रकारे शारीरिक आणि मानसिक छळ केला होता, या संपूर्ण गंभीर प्रकरणाचा डाटा पेन ड्राईव्हमध्ये गोळा करून ठेवला होता. आत्महत्येस सदर आरोपीच जबाबदार असल्याचे जयश्रीने एका व्हिडीओत स्पष्ट म्हटले होतंये. ते पुरावे अर्थातच पेन ड्राईव्ह देखील पोलिसांनी जप्त केले होते.

akola latest news
Shocking : छतावर खेळणाऱ्या मुलीला पाहून पेंटरची नीयत फिरली; नराधमाचा ७ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

मुलगी झाली, पुढं अतोनात छळ

जयश्री हिला अंदाजे तारीखेनुसार 10 मे 2022 रोजी मुलगी झाली. मुलगी झाली आणि तिच्या सासरच्या नागे कुटुंबियांकडून अतोनात छळ सुरु झाला. असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला होता, इतकेच नव्हे तर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जाणीवपूर्वक त्रास दिला जात होता, असाही आरोप झाला होता. याशिवाय जयश्री हिला तिचा पती आशिष नागे हा सतत मारहाण सुद्धा केल्याचं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत त्यावेळी नमूद होत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com