

पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत दोन शेजाऱ्यांचा वाद पेटला
अल्पवयीन मुलाचा शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला
या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या मोरवाडीत शेजाऱ्याने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर अल्पवयीन मुलाने शेजाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी येथील रेणुका गुलमोहर सोसायटीमध्ये रक्तरंजित थरार घडला आहे. एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला शेजारच्या कुटुंबीयांकडून सुरुवातीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काही मिनिटांनी अल्पवयीन मुलाची आई आल्यानंतर अल्पवयीन मुलाकडूनही शेजाऱ्यावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
पिंपरी चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरातील रेणुका गुलमोहर सोसायटीमध्ये योगेश उभळेकर यांचे कुटुंबीय मागील काही वर्षांपासून राहतात. त्यांच्या सोसायटीत घराशेजारी राहणाऱ्या संतोष कदम या व्यक्तीने कुटुंबीयांसोबत माझ्या 16 वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप योगेश उभळेकर यांनी केला आहे. संतोष कदम हे मागील काही वर्षापासून सातत्याने माझ्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत.
संतोष कदमने दहा जूनला रात्री आठ वाजता कुटुंबीयांसोबत माझ्या सोळा वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप योगेश उभळेकर यांनी केलाय. मात्र त्यानंतर काही वेळाने योगेश उभळेकर यांच्या मुलाने ही त्यांच्या पत्नीसमोर संतोष कदम यांच्यावर धारदार वस्तूने जीवघेणा हल्ला केला, याची माहिती योगेश उभळेकर यांनी देणं टाळलं आहे. आता या प्रकरणात संत तुकारामनगर पोलिसांनी दोन्ही कुटुंबीय विरोधात एकमेकांच्या तक्रारीवरून परस्पर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.