गडचिरोलीच्या चामोर्शी येथे धक्कादायक घटना
७ वर्षीय मुलीवरील बलात्कार
आरोपी पेंटरला पोलिसांनी अटक केली आहे
आरोपीविरुद्ध POCSO आणि BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
गणेश शिंगाडे, गडचिरोली
Gadchiroli Chamorshi Rape Case News गडचिरोलीतील चामोर्शीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पेंटिंगचं काम करण्यासाठी घरी आलेल्या २७ वर्षीय पेंटरने एका ७ वर्षीय चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित आरोपीला पोलिसांनी काही तासांच्या आतमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील चामोर्शी येथील रहिवाशी असलेल्या ७ वर्षीय मुलगी आपल्या घराच्या स्लॅबवर खेळत होती. याचदरम्यान त्यांच्या घरी पेंटिंगचं काम सुरु होतं. पेंटिंगचं काम करणाऱ्या प्रज्वल नावाच्या २७ वर्षीय तरुणाने मुलीला एकटीला पाहताच संधी साधली आणि बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी मुलीने आपल्या कुटुंबियांना माहिती देताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
घडलेल्या घटनेबाबत कळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीसांनी कलम २८०/२०२६कलम ६४(१),६५ (२) बिएनएस २०२३ सहकलम लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम ४,६, गुन्हा नोंद केला आणि काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या.
धक्कादायक म्हणजे नराधम प्रज्वलवर यापूर्वीही २०१९ मध्ये अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, विविध संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी चामोर्शी पोलीस ठाणे गाठून निवेदन सादर केले. आरोपीविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत पीडित मुलीला न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून पालकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई केली जाते याकडे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.