Dr. Shirish Case: 'एकदा गालावरxx' मनीषा केवळ प्यादं, खरा सुत्रधार...; डॉ. शिरीष वळसंगकरांच्या शेवटच्या कॉल्समधून सर्व उघड

Doctor Shirish Valsangkars Last Calls Reveal Mental Torture: महिलेकडून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून वळसंगकरांनी स्वत:चा शेवट केल्याचा दावा आता एका निकटवर्तीयाने खोडून काढला आहे.
Shirish Valsangkar
Shirish ValsangkarSaam Tv News
Published On

सोलापुरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आत्महत्या प्रकरणी अनेक धागेदोरे सापडत आहेत. मनीषा मुसळे माने या महिला आरोपीला वळसंगकर हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महिलेकडून झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून वळसंगकरांनी स्वत:चा शेवट केल्याचा दावा आता एका निकटवर्तीयाने खोडून काढला आहे. एका जवळच्या नातेवाईकाकडून त्यांचे वारंवार खच्चीकरण सुरू असल्याची माहिती जवळच्या निकटवर्तीयाने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण येण्याची शक्यता आहे.

वळसंगकरांच्या जवळच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर हे कणखर आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्तीमत्व होते. गेल्या वर्षाभरापासून त्यांना जवळच्या नातेवाईकाकडून सतत त्रास सहन करावा लागला होता. अपमानास्पद वागणूक, तिरस्कार, या कारणामुळे त्यांचे सातत्याने खच्चीकरण सुरू होते', अशी माहिती निकटवर्तीयाने दिली आहे.

Shirish Valsangkar
Valsangkar Case: अमावस्येच्या रात्री लिंबू अन् बाहुली रूग्णालयात ठेवायची..वळसंगकरांच्या रूग्णालयात मनीषाची काळी जादू

एकदा गालावरxxx..

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात होता. जवळच्या नातेवाईकांकडूनच हा त्रास दिला जात असल्याची माहिती आहे. त्यांच्या एका लहान वयाच्या नातेवाईकाने वळसंगकरांवर तीन वेळा हात उचलला होता. या गोष्टी त्यांनी शांतपणे सहन केल्या आहेत. ज्या मनीषा मानेला त्यांनी मोठ्या पदापर्यंत पोहोचवले, ती महिला देखील नातेवाईकाच्या हातातील बाहुली बनली आहे, अशी माहिती निकटवर्तीयाने दिली आहे.

Shirish Valsangkar
Pune News: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानियांच्या डोक्यात वेगळाच संशय

शेवटच्या कॉल्समध्ये दडलंय सत्य

आत्महत्या करण्याच्या दोन दिवसांपूर्वी वळसंगकरांनी विश्वासू उद्योजक मित्रासमोर फोनवर मन मोकळं केलं. त्यांच्यातील संवादातून वळसंगकरांना होणारा त्रास, मानसिक छळ, अपमानास्पद वागणूक याची माहिती मिळाली असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com