Valsangkar Case: अमावस्येच्या रात्री लिंबू अन् बाहुली रूग्णालयात ठेवायची..वळसंगकरांच्या रूग्णालयात मनीषाची काळी जादू

Manisha Munes Suspicious Activities Raise Questions in Doctors Death Case: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाबी समोर येत असून, तिच्याविषयी आणखी एक गंभीर माहिती उघड झाली आहे.
Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh MusaleSaam Tv News
Published On

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मृत्यूनंतर सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी १८ एप्रिल रोजी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर आरोपी मनिषाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, मनिषाबद्दल आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

रूग्णालयात मनीषा करायची काळी जादू

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एका विश्वासू व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 'रूग्णालयात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या. ज्याचा शिरीष वळसंगकर यांना वैताग आला होता. रूग्णालयात सुरू असलेल्या विविध विषयात त्यांनी लक्ष घालण्यास सूरूवात केली होती. मनीषा या काळी जादू देखील करत असल्याचा संशय आम्हा सगळ्यांना होता'.

Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
Pune News: धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा आकस्मिक मृत्यू, अंजली दमानियांच्या डोक्यात वेगळाच संशय

'अमावस्येच्या दिवशी मनीषा माने ऑन ड्यूटीवर असताना अचानक मधूनच रिक्षातून कुठेतरी जायच्या. तसेच येताना लिंबू आणि बाहुल्या सोबत घेऊन यायच्या. त्यानंतर लिंबू आणि काळ्या बाहुल्या रूग्णालयात ठेवून कामाला जायच्या', अशी माहिती डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या विश्वासू व्यक्तीने दिलीय. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
Maharashtra Politics: राज ठाकरे स्वाभिमानी, ते झुकणार नाहीत; शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं युती न होण्यामागचं कारण

वळसंगकरांच्या कुटुंबाच्या सदस्यांची चौकशी होणार

डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणात त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. वळसंगकर यांचे पुत्र आणि सुनेला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मनीषा मुसळे या महिलेचीच चौकशी करण्यात आली होती. मात्र, आता वळसंगकर यांच्या कुटुंबाचीही चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com