Maharashtra Politics: राज ठाकरे स्वाभिमानी, ते झुकणार नाहीत; शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं युती न होण्यामागचं कारण

Raj Thackerays Dignity Wont Allow Alliance with Uddhav Uday Samant: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर आपली भूमिका स्पष्ट करत ही युती होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं आहे.
Uday Samant and raj thackeray
Uday Samant On Raj ThackeraySaam Tv
Published On

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याची साद घातली. उद्धव ठाकरेंनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ठाकरे कुटुंबाच्या कलहावर पडदा पडणार का? असा प्रश्न सध्या सर्वसामान्य जनतेपासून ते राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. काही नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी ही युती होणं अशक्य आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अशातच उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे, 'ही युती होण्याची शक्यता कमी आहे', अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अटींमुळे ठाकरे बंधूंची युती अशक्य

मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांना ठाकरे बंधूंची युती होणार का? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत म्हणाले, 'मनसे प्रमुख राज ठाकरे हे स्वाभिमानी नेते आहेत. त्यांना झुकवून युती होईल असं वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अटींमुळे ठाकरे बंधूंची युती होणं अशक्य आहे', असं उदय सामंत यांनी स्पष्ट सांगितलं.

Uday Samant and raj thackeray
Accident News: भरधाव वाहनाची जबरदस्त धडक! महिला हवेत चेंडूसारखी उडाली, १५० फूटावर फेकली गेली | VIDEO

ते पुढे म्हणाले, 'कुणाबरोबर जेवायचं नाही, कुणाबरोबर बोलायचं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊ नये. पंतप्रधान मोदी -शाह यांचे फोटो लावू नयेत. अशा कोणत्याही अटी उद्धव ठाकरे घालतात. अशा परिस्थितीत राज ठाकरे यांना झुकवून युती होणं शक्य वाटत नाही, असं उदय सामंत म्हणाले.

Uday Samant and raj thackeray
Marathi Actress: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने धर्म बदलला, फोटो पोस्ट करत दिली माहिती; नेटकरी म्हणाले..अगं

उद्योग मंत्री उदय सामंत आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत माढा येथे शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवसेनेचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यानंतर उदय सामंत यांनी राज उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com