20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

‘Tuition Factory’ Exposed: नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशातील तब्बल २० हजार कोटींची 'ट्युशन फॅक्टरी' आता तपास यंत्रणांच्या रडारवर आलीय. आयआयटी आणि नीटच्या नावाखाली गल्लोगल्ली सुरू असलेल्या या कोचिंगच्या गोरखधंद्यात, पालकांची कशी आर्थिक लूट होतेय पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून.
‘Tuition Factory’ Exposed:
NEET PAPER LEAK: ₹20 THOUSAND CRORE COACHING INDUSTRY UNDER SCANNER
Published On

नीट पेपरफुटी प्रकऱणात कोचिंग चालवणारे बडे मासे गळाला लागल्यानं आता ट्युशन फॅक्टरी चांगलीच चर्चेत आलीय. आयआयटी, जेईई, नीट सारख्या स्पर्धा परीक्षेत 100 टक्के यशाची हमी देणारे ट्युशन क्लासेस गल्लोगल्ली पाहायला मिळतायत..त्यामुळे देशभरात ट्युशन फॅक्टरीची उलाढाल तब्बल 20 हजार कोटींवर पोहचलीय..मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात नावापुरता प्रवेश असतो. त्यामुळे क्लास आणि कॉलेजच्या अभद्र युतीमुळे विद्यार्थ्यांना कॉलेजला जाण्याचीही गरज भासत नाही. त्यामुळे स्वप्नांचा पाठलाग करताना मुलांसह पालकांनाही कोचिंगच्या भरवश्यावर राहावं लागतयं.

‘Tuition Factory’ Exposed:
7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

देशातील कोचिंग क्लासची इंडस्ट्री 20 हजार कोटींवर पोहचलीय. पुणे, मुंबई, कोटा आणि नागपूरसह आता छोट्या शहरांत कोचिंगचं जाळं पसरलयं.NEETच्या 1 लाख जागांसाठी 22 लाख विद्यार्थी स्पर्धेत असून 90% विद्यार्थी कोचिंगवर अवलंबून असतात.. IIT-NEETच्या मर्यादित जागांमुळे पालक मोठ्या फीच्या आमिषाला बळी पडत असल्याचं पाहायला मिळतं.. तसचं नामांकित क्लासेस 100% प्रवेशाची हमी देऊन 2 ते 3 लाख रुपये फी आकारतात.

एका क्लासमध्ये जवळपास 25 हजार विद्यार्थी असल्यानं 250 कोटींची वार्षिक उलाढाल होते.निकालाच्या दबावामुळे काही संचालक पेपरफुटीसारख्या गैरमार्गांचा अवलंब करतात, त्यात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि शिक्षणाची एकाच ठिकाणी सोय उपलब्ध केली जाते..त्यामुळे अवाढाव्या फी आकारणं शक्य होतं. मात्र लाखो रुपये खर्चूनही JEEमध्ये 77% विद्यार्थ्यांना 50% पेक्षा कमी गुण मिळतात. तर NEETचं परिक्षेत 88 हजार जागांसाठी पात्र ठरणाऱ्यांचं प्रमाण केवळ 5 टक्के आहे.

‘Tuition Factory’ Exposed:
'नीट'मुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, कधी होणार महाटीईटीची परीक्षा? नवी तारीख जाहीर

दरवर्षी सरकारच्या वेगवेगळ्या विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये काही मोजक्याच जागा निघतात. मात्र क्लाससाठी लाखो रुपये खर्च करूनही 95 ते 97 टक्के विद्यार्थी आणि पालकांच्या पदरी निराशाच येते. ट्यूशन फॅक्टरीत लूटीचा अड्डा कसा झालाय. पाहूयात. नागपूरात छोटे मोठे असे 100 कोचिंग इन्सिट्ट्यूट आहेत.. त्यात 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून तिथे 1 हजार ते 1200 कोटी कोटींची आर्थिक उलाढाल होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50-70 पेक्षा जास्त कोचिंग इन्सिट्ट्यूट असून अंदाजे जवळपास 5 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्य़ामुळे संभाजीनगरमध्ये दरवर्षी दीड ते 2 हजार कोटी रुपयांची उलाढाल होते.नाशिकमध्ये 200 पेक्षा जास्त कोचिंग क्लास असून 80 ते 90 हजार विद्यार्थी असून आर्थिक उलाढाल 700 ते 800 कोटींच्या घरात आहे.

दरम्यान नीट पेपरफुटीमुळे कोचिंग क्लासची बदनामी होत असल्यानं गैरप्रकार करणाऱ्या इन्स्टिट्यूट्स चालकांवर कारवाई करण्याची गरज कोचिंग इन्स्टिट्यूट असोसिएशननं व्यक्त केलीय. खरतर शेतकरी आणि नोकरदाराची मुलं मोठी स्वप्न घेऊन कोचिंगसाठी शहरात येतात. पालक कर्ज काढून, शेती विकून क्लासचे पैसे भरतात. मात्र अतिपैशांच्या हव्यासापोटी कोचिंग क्लासचे मालकांनी मोठी लूट सुरू केलीय.

दुसरीकडे स्वप्नभंग झालेली तरुण पिढी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतेय. मुळात कोणत्याही परीक्षेची तयारी करणं चुकीचं नाही, पण शिक्षणाच्या नावाखाली चालणारा हा लुटीचा धंदा थांबायला हवा. सरकारनं वेळीच 20 हजार कोटींच्या या अनियंत्रित काळ्या बाजारावर चाप लावायला हवा.मात्र जोपर्यंत कॉलेज आणि कोचिंग क्लासेसचं रॅकेट तुटत नाही तोपर्यंत ट्यूशन फॅक्टरीचा हा गोरखधंदा असाच सुरु राहिल...हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com