7 वर्षांपासून सुरू NEET पेपर चोरी? मोटेगावकरसाठी कुलकर्णी फोडायचा पेपर?

need exam scam : नीट पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक खुलासा समोर आलाय...गेल्या 7 वर्षांपासून नीटचा पेपर चोरला जात असल्याचा संशय सीबीआयच्या तपासात समोर आलाय... त्यामुळे सीबीआयच्या रडारवर आता कोण कोण आहे? NEET पास झालेल्या कोणत्या विद्यार्थ्यांची चौकशी होणार? पाहूयात या विशेष रिपोर्टमधून....
neet exam scam news
neet exam scam Saam tv
Published On

ज्यावर नीटचा पेपर पारदर्शक घेण्याची जबाबदारी होती.. तोच नीटचा पेपर सेटर पी.व्ही. कुलकर्णी पेपरफुटीचा मास्टरमाईंड निघाल्यानं संपूर्ण शिक्षण व्यवस्थाच हादरलीय...पेपरफुटीचा पर्दाफाश यंदा झाला असला तरी गेल्या काही वर्षांपासून हा घोटाळा सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षात नीट पास झालेले विद्यार्थीही सीबीआयच्या रडारवर आले आहेत.

NEETचे विद्यार्थी CBIच्या रडारवर?

कुलकर्णी, शिवराज मोटेगावकरच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांची चौकशी

2019पासून दोघांच्या संपर्कात असलेले विद्यार्थी CBIच्या रडारवर

CBI दोघांच्या संपर्कात असलेल्यांची चौकशी करणार असल्याची माहिती

NEET पेपरफुटीसंदर्भात CBI विद्यार्थ्यांची चौकशी करणार

दरम्यान लातूरच्या दयानंद महाविद्यालयात 28 वर्षे प्राध्यापक राहिलेला आणि सध्या पुण्यात राहणारा प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याच्या चौकशीमुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणि जुने धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जातेय...

neet exam scam news
NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

पी. व्ही. कुलकर्णी हा केमिस्ट्रीचा प्राध्यापक असल्यानं प्रामुख्यानं तो केमिस्ट्रीचा पेपर फोडायचा. कुलकर्णी 7 वर्षांपासून NTAचा पेपर सेट करत होता... ज्य़ामुळे कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडून आणि मोटेगावकरपर्यंत पोहचवत असल्याची माहिती समोर येतेय...

कुलकर्णीची 2019 मध्ये NTA मध्ये विषय तज्ज्ञ म्हणून एन्ट्री झाली... त्यानंतर तो वेटिंग टीमचा सदस्य झाला...तज्ज्ञांनी विषय़ानुसार तयार केलेल्या पेपरच्या 5 सेटपैकी अंतिम 2 सेट निश्चित करण्याचं काम वेटिंग टिमकडे होतं...ज्यामुळे वेटिंग टिममधील कुलकर्णीनं सांगितलेले फायनल दोन पेपर प्रिंट होण्यासाठी जात. तसचं कुलकर्णी या दोन्ही पेपरचा मराठीत अनुवादही करत होता. खरतर एका तज्ज्ञांकडे एकच काम असते, मात्र कुलकर्णीला NTAत दोन कामांची जबाबादीर दिल्यानं NTAत कुलकर्णीचे आणखी कुणाशी कनेक्शन होते, याचा तपास सीबीआय करतेय.

neet exam scam news
नीट पेपरफुटी घोटाळा उघड; 75 विद्यार्थ्यांना लाखोंमध्ये प्रश्नपत्रिका विक्री?

दुसरीकडे मांढरे आणि कुलकर्णी विद्यार्थ्यांना विशेष शिकवणीतून ज्या लिखित प्रश्नपत्रिका पुरवायचे, त्या प्रश्नपत्रिका सीबीआयच्या हाती लागलेत...ज्यामुळे सीबीआयच्या तपासामुळे चिटिंग करून डॉक्टर झालेल्या विद्यार्थ्यांचे धाबे दणाणले आहेत. कुलकर्णीला NTA मध्ये नेमकं कोण मदत करत होतं...NTAत पेपर फोडण्यासाठी त्याला कोणाचा पाठिंबा होता... यासगळ्या प्रश्नांची उत्तर सीबीआयला पेपरफुटीतील या रॅकेटमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांपर्यंत घेऊन जातील, हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com